अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज यांचे मंदीर खुले करा - वैभव गोसावी (भारती) यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे मागणी

अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज यांचे मंदीर खुले करा - वैभव गोसावी (भारती) यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे  निवेदनाव्दारे मागणी

इंदापूर || अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज यांचे मंदीर येणाऱ्या गुरू पौर्णिमे दिवशी भक्तांसाठी खुले करण्यात यावे अशी मागणी इंदापूर तालुक्यातील वडापूरी गावचे रहिवाशी वैभव रतन गोसावी (भारती) यांनी गुरुवार दि.15 जुलै रोजी केली आहे. या मागणीचे लेखी निवेदन ही त्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहे.

दि.२२ जुलै २०२१ पर्यंत निर्णय न केल्यास वेळ ११ ते १२ या वेळेत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण घंटानाद आंदोलन करणार असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.

मी अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा थेट ६ वंशज असून महाराजाप्रती माझी प्रचंड भक्ती आणि श्रध्दा आहे. गेल्या २ वर्षेपासून देशामध्ये व महाराष्ट्र मध्ये कोवीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे सर्व मंदीरे भाविक भक्तासाठी दर्शनासाठी शासनाने नित्य पूजा वगळता बंद ठेवलेली आहेत. यामध्ये अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी महाराज या मंदीराचाही समावेश आहे.

आपल्या शासकीय आदेशानुसार मंदीरातील सर्व उत्सव मंदीर ट्रस्ट ने आपलया आदेशाचे पालन करून बंद ठेवलेले आहे. आता बऱ्यापैकी शासनाने अनलॉक केलेला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या  गुरू पौर्णिमा या दिवशी महाराष्ट्रातील बरेच भक्त भाविक महाराजांच्या दर्शनासाठी येण्याची व दर्शन घेण्याची फार जुनी परंपरा आहे. तरी आपण भाविक भक्तांच्या श्रध्देचा आपल्या शासन स्तरावर विचार विनियम करुन  स्वामी महाराज याचे कृपा आशिर्वाद भाविक भक्तांना घेण्यासाठी शासनाचे सर्व नियमांचे पालन करून मंदीर खुले करावे अशी अनेक भक्तांची गुप्त इच्छा आहे.

अक्कलकोट मधील अनेक नागरिकांचा रोजगार या मंदीरावर अवलंबून असल्यामुळे मंदीर उघडल्यामुळे बेरोजगार लोकांनाही रोजगार निर्माण होईल. या दोन्ही गोष्टीचा आपण गांर्भीयाने विचार करून शासन स्तरावर विचार विनियम करून मंदीर खुले करावे, अशी लेखी विनंती वैभव गोसावी - भारती यांनी केली आहे.