ई लर्निंग साठी नरुटवाडी जिल्हा परिषद शाळेला मिळाला टेलिव्हिजन संच

ई लर्निंग साठी नरुटवाडी जिल्हा परिषद शाळेला मिळाला टेलिव्हिजन संच

इंदापूर || राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वच गोष्टींना खीळ बसली असताना शिक्षण क्षेत्रातही आमूलाग्र बदल होत आहेत.मुलांना उतृष्ट दर्जाचे शिक्षण घेता यावे यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती तथा विद्यामान सदस्य प्रविण माने यांच्या प्रयत्नातून बुधवारी दि.21 रोजी नरुटवाडी याठिकाणी ई लर्निंग ४३ इंच टेलिव्हिजन स्क्रीनचे जिल्हा परिषद माध्यमातून वाटप करण्यात आले. 

यावेळी मुख्यध्यापक सुरवसे सर, राहुल देवकर, विशाल दिवसे, अक्षय कोकाटे, सुभाष दिवसे, प्रविण देवकर, कृष्णा दिवसे, हरी व्यवहारे, गिरीश मारकड, अक्षय शिंदे व  इतर मान्यवर उपस्थित होते.

तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी पळसदेव, वरकुटे बु,माने लावंडवस्ती रुई, कालठण नं २, न्हावी बोराटवाडी, अगोती २ ढुकेवस्ती, रुई गावठाण या गावातील शाळांसाठी अशा पद्धतीचे संच वाटप करण्यात आले आहेत.