नायर रूग्णालयातील 26 वर्षीय डाॅक्टरच्या आत्महत्तेचे गूढ उकललं ; हे आहे कारण…

नायर रूग्णालयातील 26 वर्षीय डाॅक्टरच्या आत्महत्तेचे गूढ  उकललं ; हे आहे कारण…

मुंबई 02 // दिनांक 15 फेब्रुवारी रोजी मुंबईतील नायर रुग्णालयामध्ये भीम संदेश तुपे या डॉक्टरने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्यानंतर या संदर्भात आग्रिपाडा पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित  मृत्यू ची नोंद करण्यात आली होती, मात्र आत्महत्येचे कारण आता समोर आले असून, पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये डॉ. तुपे यांच्या प्रेयसीचे लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत ठरल्यामुळे नैराश्य येऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

डॉ. तुपे नायर रुग्णालयात  भूलतज्ज्ञ होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. वडिलांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर डॉ. तुपे नायर रुग्णालयात परतले. 15 फेब्रुवारीला दिवसभर त्यांनी रुग्णालयात नेहमीप्रमाणे काम केलं.डॉक्टर तुपे ज्या खोलीत झोपायचे, ती खोली सकाळी उशिरापर्यंत बंद होती. खोलीचं दार ठोठावूनही आतून काहीही उत्तर आलं नाही. त्यामुळे काही जणांनी मिळून खोलीचं दार उघडलं. तेव्हा डॉक्टर तुपे हे मृतावस्थेत आढळून आले होते. 

पोलीस यंत्रणेने  आकस्मित मृत्यूची नोंद केल्यानंतर केलेल्या अधिकाच्या तपासात असं निष्पन्न झाले आहे,की डॉक्टर भीमसंदेश तुपे यांचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ती नागपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. एमबीबीएसचं शिक्षण घेत असताना दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. पुढील अभ्यासासाठी डॉक्टर तुपे मुंबईत आले, तर संबंधित तरुणी नागपूरमध्ये शिक्षण घेत होती. नंतरच्या काळातही दोघं फोन आणि मेसेजच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते.काही दिवसांपूर्वी डॉक्टर तुपे यांच्या प्रेयसीचं अन्यत्र लग्न ठरलं होतं. त्यामुळे ते काहीसे नाराज होते. त्यामुळेच भीमसंदेश यांनी आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.