इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी प्रयत्न करा - मा.नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे यांचे आवाहन

इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी प्रयत्न करा - मा.नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे यांचे आवाहन

इंदापूर || इंदापूर शहराचा चेहरा मोहरा बसवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सध्या शहरात विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असून आता कार्यकर्त्यांनी इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे यांनी केले.

शहरातील वार्डक्रमांक सात मधील व्यंकटेश नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी कार्यकर्त्यांशी मार्गदर्शन करताना ननवरे बोलत होते.

राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेण्यात आली. यावेळी शहरातील विकास कामांचा आढावा घेण्यात आला.यावेळी व्यंकटेशनगर येथील युवा कार्यकर्ते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष वसीम भाई बागवान यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. 

बैठकीमध्ये या भागातील विकास कामासंदर्भात चर्चा झाली. तसेच व्यंकटेशननगर येथील घरकुल संदर्भातील विषयावर विस्तृत चर्चा होऊन त्यावर ट्रस्ट आणि नगरपालिकेशी चर्चा करुन घरकुले देणेबाबत संदर्भातला प्रलंबित विषय सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे यांनी दिली.            

यावेळी शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे माजी अध्यक्ष अनिल राऊत, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, माजी युवक शहराध्यक्ष इम्रान भाई शेख,युवक कार्याध्यक्ष वसिमभाई बागवान, साजन ढावरे, समदभाई सय्यद,सुभाष मोरे व व्यंकटेशनगर भागातील प्रमुख कार्यकर्त उपस्थित होते.