अबब…दत्ता मामांनी दिलं सणसर-लासुर्णे गटासाठी जिल्हा नियोजन समितीतून 8 कोटी

अबब…दत्ता मामांनी दिलं सणसर-लासुर्णे गटासाठी जिल्हा नियोजन समितीतून 8 कोटी

इंदापूर || राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात विकास कामांचा धडाकाचं लावला आहे.सणसर-लासूर्णे जिल्हा परिषद गटासाठी लाडक्या दत्ता मामांच्या माध्यमातून तब्बल 8 कोटी रुपयाचा विकास निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ यांनी दिली. 

या भरघोस निधी मधून सणसर लासुर्णे जिल्हा परिषद गटात गावामधील अंतर्गत रस्ते,बंदिस्त गटर श्र, ग्रामपंचायत विस्तारीकरण,ग्रामपंचयात नविन इमारत बांधणे,स्मशानभूमी सुधारणा करणे,चौक सुशोभिकरण करणे, वॉल कंम्पाउंड बांधकाम करणे,प्रकाश व्यवस्था (हायमास्ट दिवे)करणे अशा प्रकारची विविध कामे करण्यात येणार आहेत.ही सर्व कामे जनसुविधा नागरी सुविधा मधून मंजूर झाली आहेत.तर गावाला जोडणारे मुख्य रस्ते 3054/5054 अंतर्गत मंजूर झालेले आहेत. 

दत्तात्रय भरणे हे मंत्री मंडळात मंत्री म्हणून दाखल झाल्यानंतर त्यांनी इंदापूर तालुक्यात विकास कामांवर अधिकचा भर दिला आहे.करोडो रुपयाचा निधी तालुक्यातील विकास कामांसाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मिळाला असून तालुक्यात विविध ठिकाणची विकासकामे प्रगतीपथावर आहेत. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या रुपाने तालुक्याला विकसनशील नेतृत्व लाभले असून त्यांच्या हातून तालुक्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ यांनी यांनी व्यक्त केली आहे.

◾जन सुविधा व नागरी सुविधा मधून मंजूर रक्कम व गावे -

 • सपकळवाडी- 69 रु.लक्ष
 • बेलवाडी- 59 रु.लक्ष
 • लासुर्णे- 78 रु. लक्ष
 • सणसर - 133 रु. लक्ष
 • कुरवली- 25 रु. लक्ष
 • पवारवाडी- 9 रु. लक्ष
 • थोरातवाडी- 21 रु. लक्ष
 • मानकरवाडी- 15 रु. लक्ष
 • उध्दट- 30 रु. लक्ष
 • चिखली- 31 रु. लक्ष
 • जाचकवस्ती- 40 रु. लक्ष
 • जांब- 32 रु. लक्ष
 • तावशी - 5 रु. लक्ष 

3054 मधून मुख्य रस्त्यांसाठी मंजूर रक्कम व रस्ते 

 • इ.जि.मा.202 ते इ.जि.मा.195 ला मिळणारा सपकळवाडी रस्ता (ग्रा.मा.271) - 15 रु. लक्ष
 • ग्रा.मा.24 चव्हाणवाडी ते इ.जि.मा.197 रस्ता ग्रा.मा.103 - 50 रु.लक्ष
 • रा.मा.121 ते रणवरे मळा मार्ग थोरातवाडी (ग्रा.मा.224) - 15 रु. लक्ष
 • थोरातवाडी ते कावळे मळा रस्ता ग्रा.मा.364 - 15 रु.लक्ष
 • कुरवली मेसाई मंदीर कडे जाणारा रस्ता ग्रा.मा.124 - 40 रु. लक्ष
 • रामा 121 ते भोईटेमळा ग्रामा 123 - 20 रु. लक्ष 

◾5054 मधून मुख्य रस्त्यांसाठी मंजूर रक्कम व रस्ते-

 • रा. मा. 121(भवानीनगर) ते तावशी रस्ता (इ.जि.मा.202) - 75 रु.लक्ष
 • सणसर सपकळवाडी तावशी रस्ता इ.जि.मा.195 - 15 रु.लक्ष