मंत्री भरणे यांनी खोरोचीच्या नगरे कुटुंबाची घेतली भेट ; रोख स्वरूपात 25 हजार रुपये मदत

मंत्री भरणे यांनी खोरोचीच्या नगरे कुटुंबाची घेतली भेट ; रोख स्वरूपात 25 हजार रुपये मदत

इंदापूर || तालुक्यातील खोरोची गावातील किसन नगरे यांच्या घराला शाॅर्ट सर्कीटमुळे आग लागली होती.या घटनेत नगरे यांचा संसार जळून खाक झाला होता.सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी दि.23 रोजी नगरे कुटुंबाची भेट घेतली विचारपूस करुन नगरे कुटुंबाला यातून सावरण्यासाठी गावाच्या वतीने 45 हजार रुपये किमतीच्या गृह उपयोगी वस्तू देण्यात आल्या. शिवाय मंत्री भरणे यांनी 25 हजार रुपये रोख स्वरुपात मदत देऊ केली.शिवाय नगरे यांचा संसार सावरण्यासाठी घरकुल मंजूर करून देण्याचे कबुल केले.

यावेळी खोरोची गावातील संजय चव्हाण,संपत सरक, भाऊसाहेब देवकर,दादा भाळे, दत्तात्रय फडतरे,राहुल सरक,दादा हेगडकर, विशाल देवकर,कुमार साठे,राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व ग्रामस्त उपस्थित होते. मंत्री भरणे यांनी देऊ केलेल्या व गावकऱ्यांनी केलेल्या मदतीबद्दल किसन नगरे यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले आहेत.