इंदापूरच्या मूकबधिर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रशिक्षणाद्वारे घेतले मास्क बनवायचे धडे

इंदापूरच्या मूकबधिर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रशिक्षणाद्वारे घेतले मास्क बनवायचे धडे

इंदापूर || श्री समर्थ व्यायाम मंडळ संचलित मूकबधिर निवासी शाळा इंदापूर या शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवी या वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी कोरोना च्या कालखंडामध्ये घरी बसून मास्क बनवण्याचे ऑनलाइन द्वारे प्रशिक्षण घेऊन मास्क बनवले आहेत.

यामध्ये शाळेचे कला शिक्षिका  निशा चकोर,वर्गशिक्षक व इतर सहकारी शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना ऑनलाइन द्वारे प्रशिक्षण देऊन मास्क बनवून घेतले आहेत . या विद्यार्थ्यांनी तयार केलेले मास्कवर दिव्यांग प्रवर्गातील कर्णबधिर प्रवर्गाचा लोगो आहे. तसेच मास्क चा वापर कसा करायचा, धुवायचा  कसा  हे सुद्धा विद्यार्थी  ऑनलाईन प्रशिक्षणात शिकल्यामुळे  व्हिडिओ दारे इतरांना सांगतात.कोरोना कालावधीमध्ये अशा प्रकारचे मास्क बनवून ते इतरांना मदत करत आहेत व आपला खारीचा वाटा देत आहेत.

अशा या सामाजिक कार्याच्या उपक्रमाबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व  शाळेच्या अध्यक्ष  प्रदिप  गारटकर व जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण  कोरगटीवार व मुख्याध्यापक अमोल उन्हाळे यांनी  विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.