मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड इंदापुर कडून शिवजन्मोत्सव निमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन - अध्यक्ष राहुल गुंडेकर 

मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड इंदापुर कडून शिवजन्मोत्सव निमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन - अध्यक्ष राहुल गुंडेकर 

इंदापूर 17 // कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवजन्मोत्सव सोहळा हा अत्यंत साध्या पद्धतीने व शासकीय नियमांचे पालक करून साजरा होणार असला तरी मराठा सेवा संघ इंदापूर व जिजाऊ ब्रिगेड इंदापूर कडून शिवजन्मोत्साव निमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मराठा सेवा संघाचे इंदापूर शहराध्यक्ष राहुल गुंडेकर यांनी दिली.

ते म्हणाले की, सर्व शासकीय नियमाचे पालन करून कार्यक्रम पार पडणार आहेत.शुक्रवार दि.19 फेब्रुवारी रोजी  सकाळी १० ते १२ या नियोजित वेळेत राहुल सिनेमा इंदापूर येथे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. शिवभुषण पुरस्कार , आयोजित स्पर्धेचे विजेते यांचा सम्मान , उल्लेखनीय कामगिरी गौरव पुरस्कार , उद्योजक या फेसबुक पेज चे प्रकाशन , विविध क्षेत्रातील (मराठी) उद्योजक यांचा सन्मान , शिवगर्जना,जिजाऊ वंदना , पटनाट्य , डाॅन्स (शिवजन्मतोसव) , व्याख्यान , पत्रकार सन्मान व कला क्षेत्रातील विविध पुरस्कार सन्मान सोहळा  असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेऊन हा सोहळा आपणाला साजरा करावयाचा आहे.यासाठी प्रत्येकाने मास्क,सॅकिटायझर याचा अवश्य वापर करून हा आनंद साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.