मामा म्हणतात घरोघरी मातीच्याचं चुली ; माझं दुखणं तुमच्यापेक्षा कितीतरी मोठे

मामा म्हणतात घरोघरी मातीच्याचं चुली ; माझं दुखणं तुमच्यापेक्षा कितीतरी मोठे

इंदापूर || सर्वांना दु:ख आहे,प्रत्येकाच्या आयुष्यात ते कमी जास्त असते घरोघरी मातीच्याच चुली असतात. तुमच्या सर्वांपेक्षा माझं दु:ख कितीतरी मोठे आहे. मात्र मी संयम ठेवतो.दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं.त्यामुळे तुमच्या अनं माझ्या संसारात फार मोठा फरक नाही.जी माणसे काम करतात त्यांच्या कामाची नोंद घ्या.असं भावनिक आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नागरिकांना केलयं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शनिवारी दि.13 नोव्हेंबर रोजी इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते याचे उद्घाटन पार पडले यावेळी ते बोलत होते.

हर घर जल योजनेच्या माध्यमातून मला प्रत्येक भगीणीच्या डोक्यावरचा हंडा उतरवायचा आहे. जंक्शन साठी १ कोटी ७५ लाख रुपयाचा पाण्याचा आरखडा आपण तयार ठेवला आहे. मात्र घरात पाणी आल्यावर का होईना या मामाची कुठेतरी आठवण ठेवा.असं भरणे यांनी म्हटले आहे.

आम्ही कामे करतो म्हणजे काय तुमच्यावर उपकार करत नाही. असं भरणे यांनी ठणकावून सांगितले आहे.तुम्ही जनतेने मला ज्या खुर्चीवर भसवले आहे ती खुर्ची कामे करण्यासाठीचं आहे अनं तेच मी करतो असं ते म्हणाले आहेत.दोन वर्षात कोरोनाचे संकट होते.मात्र आता लाट ओसारत आहे. आता तालुक्यात अधिक गतीने विकास कामे केली जातील. कोणतेही काम करताना मी केले असे कधीच म्हणत नाही, कारण मी केले असे म्हणालो की अडचणी वाढतात यासाठी आपण केले असे म्हणा. हा मामा तुमच्यासाठी नेहमीच दोन पाऊल पुढे असतो. आपल्याला बेरीज करायची आहे. त्या दृष्टीने आता कार्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे. यासाठी आपापसातील मतभेद कुठेतरी थांबवा. असे आवाहन ही त्यांनी केले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी अपंगांसाठी वयोश्री योजने अंतर्गत कार्यक्रम आयोजित केला आहे.दि.१५ नोव्हेंबर पासून त्याची नोंदणी सुरु आहे.त्यासाठी कार्यकर्त्यांनी अपंग बांधवांना मदत करावी.शेवटी गरीब माणूसच आपला देव आहे. गरीबात देव बघा त्यातून जे समाधान मिळेत ते वेगळे असते असे ही ते म्हणाले आहेत.