नोकरीच्या मागे धावता व्यवसायातून प्रगती साधा - अंकिता पाटील यांचे युवकांना आवाहन

नोकरीच्या मागे धावता व्यवसायातून प्रगती साधा - अंकिता पाटील यांचे युवकांना आवाहन

इंदापूर || कोरोनाच्या प्रकोमुळे सर्वांची अवस्था बिकट झाली आहे. अशा स्थितीत सर्वांनाच सरकारी नोकरी भेटले असे नाही,प्रयत्न जरी करा मात्र टोकाचे पाऊल उचलू नका. नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःचा लहान मोठा उद्योग व्यवसाय उभा केल्यास त्यातून मोठी भरारी घेता येते याची अनेक उदाहरणे समाजासमोर आहेत. यासाठी  नोकरीच्या मागे धावता व्यवसायातून प्रगती साधा असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.

सोमवारी दि.12 रोजी वडापुरी येथे माऊली बळीराम काटकर यांच्या माऊली लाईट हाऊस आणि श्री गोवर्धन पशुखाद्य या दोन्ही दुकानांचे उद्घाटन अंकिता पाटील यांचे हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.

अंकिता पाटील म्हणाल्या,की काटकर कुटुंबीय हे शेतकरी कुटुंब आहे त्यामुळे शेती व शेतकऱ्यांशी नाळ जोडली गेली असल्याने जनावरांसाठी चांगल्या दूध उत्पादनवाढीसाठी पशुखाद्य (पेंड) विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे व यामध्ये विविध प्रकारची व्हरायटीज या ठिकाणी सर्व दूध उत्पादकांसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यांनी पशुखाद्य या सोबतच इलेक्ट्रॉनिक्स चा व्यवसायाचा एक उत्तम मार्ग त्यांनी स्वीकारला आहे.

वडापुरी व आजूबाजूच्या गावांमधील लोकांना इंदापूर येथे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंवा पशुखाद्य खरेदी करण्यासाठी जावे लागत असते व त्यामुळे लोकांचा वेळ व प्रवास वाढत होता या सर्व गोष्टींचा विचार करून लोकांना त्वरित आपल्या जवळच विविध प्रकारच्या कंपनीचे व चांगली दर्जा असणाऱ्या वस्तू या ठिकाणी उत्तम दरात उपलब्ध करून दिलेल्या आहे.माऊली काटकर यांनी धाडसाने हा निर्णय घेऊन समाजापुढे व सर्व युवकांनपुढे आदर्श समोर ठेवला जाईल अशी कामगिरी केली आहे.