महेश चावले यांनी इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी पदाचा पदभार स्विकारला

महेश चावले यांनी इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी पदाचा पदभार स्विकारला

इंदापूर दि.29 // इंदापूर तालुका क्रिडा अधिकारी सुहास होनमाने यांची बदली झाल्यानंतर महेश चावले यांनी इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी पदाचा पदभार नुकताच स्विकारला आहे.नव्यानेच रुजू झालेले महेश चावले यांचा त्यानिमित्त महेंद्रदादा रेडके मित्र परिवाराकडून यथोचित सन्मान करुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी इंदापूर तालुका रुग्ण कल्याण समितीचे सदस्य  महेंद्रदादा रेडके, इंदापूर पं.समिती सदस्य सतीश पांढरे, युवा नेते भाजपा अमोल इंगळे, संदीप रेडके, गणेश शिंगाडे, अशोक करे, सुधीर पाडूळे, नारायण आसबे,  राहुल शिंदे,शिवकुमार गुणवरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महेश चावले म्हणाले कि मी सन 2000 पासून क्रिडा अधिकारी म्हणून सेवेत आहे. चंद्रपूर, पुणे,मुंबई अशा ठिकाणी सेवा बजावून पुन्हा एकदा इंदापूर करांच्या सेवेत दाखल झालो आहे. 2009-2013 या कालावधीत मी इंदापूर मध्ये काम केले असल्याने तालुक्यातील सामाजिक,राजकिय व भौगोलिक परिस्थितीचा जवळून अभ्यास आहे.सर्वांना सोबत घेऊन तालुक्याचा क्रिडा क्षेत्रात सर्वांगीण विकास मला करावयाचा आहे.

1999 साली इंदापूरच्या क्रिडा संकुलाची निर्मिती झाली असून ते 9 एकर क्षेत्रावर विभागले आहे.महाराष्ट्र राज्यात सर्वात पहिले क्रिडा संकुल म्हणून त्या काळी त्यास मान्यता मिळाली. मात्र इंदापूरच्या पाठीमागून पुणे जिल्ह्यातील सर्व संकुले विकसीत झाली. इंदापूरचा मात्र विकास झाला नाही याला प्रशासनातील अधिकारी वा इतर कोण जबाबदार असतील मात्र याचा उहापोह न करता आपल्याला क्रीडा संकुलाचा विकास करावयाच आहे. क्रीडा विभागाच्या वतीने व्यायमशाळा अनुदान योजना असून ती ग्रामपंचायत व जिल्हा परिषद मध्यमातून राबवली जाते.यात 7 लाख रुपयाचे व्यायामाचे साहित्य वितरित केले जाते अाणि तालुक्यात ती आपल्याला सक्षमपणे राबवायची देखील आहे. कोरोनाच्या काळात नागरिकांना व्यायामाची आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे शरिर हीच संपत्ती आहे हे आता पटलेले देखील आहे. त्यामुळे शरिर कमावले तर सर्व आजारांवर प्रतिकार करता येऊ शकतो.ख-या अर्थाने क्रीडा विभाग काय करतो हे जनसामान्यांना माहीतचं नाही. माणसाला शारिरिक दृष्ट्या सुजलाम सुफलाम बनवण्याचे काम आम्ही करित असतो.शाळांसाठी देखील चार लाख रुपयाची योजना आहे. यासाठी मी स्वतः शाळांना प्रस्ताव देण्याचे आवाहन करतो असे ते म्हणाले. येणाऱ्या काळात इंदापूर मध्ये क्रीडा क्षेत्र रुजवण्याचा माझा प्रयत्न असेल त्याला समाजतून सर्व स्तरातून सहकार्य मिळावे अशी अपेक्षा आहे.