महात्मा फुलेंनी दिवसरात्र कष्ट घेऊन समाजाला दिशा देण्याचं काम केलं - संतोष राजगुरू

महात्मा फुलेंनी दिवसरात्र कष्ट घेऊन समाजाला दिशा देण्याचं काम केलं - संतोष राजगुरू

इंदापूर ||  सावता परिषदेच्या वतीने इंदापूर तालुक्यात ठीक ठिकाणी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती अत्यंत साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली. भोडणी या ठिकाणी सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्प हार घालून अर्पन करुन पूजन करण्यात आले.

यावेळी तालुका अध्यक्ष प्रकाश नेवसे ,विष्णु झगडे ,राहुल ननवरे , युवा आघाडी तालुका अध्यक्ष अमर बोराटे, महादेव शेंडे विक्रांत इनामके, अँड.सौरभ इनामके,ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदे, वैभव शिंदे, सौरभ शिंदे, रणजित टिळेकर,पै.रणजित गिरमे, शुभम गवळी,शाम गिरमे आदी उपस्थित होते. 

यावेळी संतोष राजगुरू म्हणाले,की ज्यांनी तमाम बहुजनमंच आयुष्य फुलवलं.शिक्षणाची गंगा बहुजनांपर्यंत आनून पोहोच केली.अशा क्रांतिसूर्य महात्मा फुले व माता सावित्रीबाई फुले यांसह सर्वच महापुरुषांना यांना मी प्रथम वंदन करतो.आज संपूर्ण विश्वावर कोरोनाचे संकट असल्याने आपण यावर्षी अत्यंत साध्या पध्दतीने अभिवादन करत आहोत. वास्तविक क्रांतिसूर्य महात्मा यांचे कार्य सातासमुद्रांपलीकडे आहे.संपूर्ण देशभर त्यांच्या जयंतीचा दरवर्षी जल्लोष असतो. यंदा मात्र आपणाला काही नियम पाळावे लागले कारण संकट ही तसेच आहे.त्यामुळे आज समाजबांधव आपापल्या घरोघरी अभिवादन करत आहेत.

क्रांतिसूर्य महात्मा फुलेंचे विचार शिवाजी महाराजांनी त्या काळात केलेलं कार्य हे घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत आनण्याचे महान कार्य केले.महात्मा फुले यांनी त्या काळात एक विशिष्ट समाजाची रणनिती होती,एक समाजाचा पगडा होता त्या पगड्याला न जूमानता महात्मा फुलेंनी दिवसरात्र कष्ट घेऊन समाजाला दिशा देण्याचं काम केलं. महात्मा फुलेंनी शेतीसाठी पाणी आडवा पाणी जिरवा हे धोरण अवलंबलं आणि त्यावेळेस त्यांनी अवलंबलेले धोरण आताचं सरकार या ठिकाणी राबवत आहे. या दोन्ही दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं. महात्मा फुले यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करावे.अशी त्यांनी सावता परिषदेच्या वतीने केली. 

सावता परिषदेच्या माध्यमातून कालच यासाठी सावता परिषदेचे प्रमुख कल्याणराव आखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये "सावता परिषद एक विचारधारा" ही व्याख्यानमाला आयोजित केली. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले.सावता परिषदेच्या माध्यमातून आजपर्यंत माळी समाजाच्या, ओ.बी.सी.च्या,अल्पसंख्यांकांच्या मागण्यासाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरून संघर्ष केला.आणि म्हणूनचं फेसबुक च्या माध्यमातून आँनलाईन पद्धतीने विचारधारा समाजावपर्यंत पोहचवण्यासाठी ही एक आगळीवेगळी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.याचा लाभ समाजबांधवांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गणेश गवळी यांनी केले.