इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी ग्रामपंचायत ठरली शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्काराची मानकरी ; अजितदादांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी ग्रामपंचायत ठरली शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्काराची मानकरी ; अजितदादांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

इंदापूर || तालुक्यातील लाखेवाडी ग्रामपंचातीला शरद आदर्श कृषी ग्राम या पुरस्काराने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुणे जिल्हा परिषद पुणेे व कृषी विभाग यांच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी पुण्यात देण्यात आला.

शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार मिळाल्याने लाखेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच,उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांचा  गावातील ग्रामस्थांच्यावतीने सन्मान करण्यात आला. 

यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी कृषी विस्तार अधिकारी युनुस शेख, ग्रामसेवक गणेश खरमाटे, सरपंच सोमनाथ गायकवाड, उपसरपंच रंजना चव्हाण, सदस्य सोपान ढोले,वामन थोरवे, बाळासो खुरंगे, बबन खाडे, सदाशिव बागल, गणेश भिंगारदिवे, तानाजी टकले, संजय रसाळ, सोमनाथ भोसले, सदाशिव बरकडे, हनुमंत जाधव,वसंत थोरवे व नवनाथ खुरंगे यांचा सन्मान करून अभिनंदन केले. 

शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार सोहळा पुणे जिल्हा परिषद पुणे कृषी विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्याचे वितरण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख रक्कम एकवीस हजार रुपयाचा चेक देऊन करण्यात आले. 

इंदापूर तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत लाखेवाडी या पुरस्काराची मानकरी ठरली.पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने  शेती, पाणी, फळबागा, भाजीपाला, शेततळे बायोगॅस, वृक्षरोपण, दुग्ध व्यवसाय, सेंद्रिय शेती,गाय गोठा अशा सर्व निकषांची चांगल्या प्रकारे उत्तम नियोजन करून केलेल्यांची पडताळणी करण्यात आली.उत्तम द्राक्ष शेती बागायतदार  मा.जि.प.सदस्य श्रीमंत ढोले, पाण्याचे सिंचनद्वारे योग्य नियोजन आप्पासो काळंगे व  दुग्ध व्यवसाय मध्ये अग्रेसर असलेले आबासाहेब उगलमोगले यांचा गाय गोठा याची कृषी विभाग यांच्याकडून पाहणी करण्यात आली होती.यामध्ये इंदापूर तालुक्यातील एकमेव लाखेवाडी ग्रामपंचायत सक्षम दिसून आले त्यामुळे शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.