एल जी बनसुडे विद्यालयाचे राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत यश

एल जी बनसुडे विद्यालयाचे राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत यश

इंदापूर 04 // १ मार्च २०२१ रोजी इंदापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुराश स्पर्धेमध्ये पळसदेव येथील एल जी बनसुडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले.या स्पर्धेमध्ये वयोगट १२ ते १७ मध्ये  व वजनगट ५५ kg मध्ये जगदीश तोंडे पाटील ( राज्यात प्रथम ), वयोगट १४ ते १७ वर्ष व वजनगट ५५ kg मध्ये सोहम संतोष कांबळे ( राज्यांमध्ये प्रथम क्रमांक) ,वयोगट १४ ते १७ वर्ष व वजनगट ५० kg मध्ये सागर करे (राज्यात प्रथम ),वयोगट १७ वर्ष व वजनगट ५० kg अफताब तांबोळी (राज्यात प्रथम),वयोगट १४ ते १७ वर्ष व वजनगट ५० महेश मगर( राज्यात तृतीय ) ,वयोगट १४ ते १७ वर्ष व वजनगट ५५ kg सिद्धार्थ महेश लोळगे (राज्यात द्वितीय क्रमांक ) या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक म्हणून सागर बनसुडे व लक्ष्मण गडदे यांचे स्कूलचे प्राचार्य सुरज बनसुडे, उपप्राचार्य दत्तात्रय शिंदे, विभाग प्रमुख दिपक वडापूरे,  शिक्षक प्रविण मदने ,अविनाश लावंड ,नवनाथ माळवदकर ,सीमा बाराते, बस चालक श्रीपाद शिंदे ,गणेश चव्हाण ,अमोल मिसाळ,भावेश फासे,सनि कुचेकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.