कल्याणीची शिकण्याची धडपड पाहून हर्षवर्धन पाटील ही भारावले ; उचलला महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च

कल्याणीची शिकण्याची धडपड पाहून हर्षवर्धन पाटील ही भारावले ; उचलला महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च

इंदापूर || राज्यात दहावी परीक्षेत 100 टक्के गुण मिळवून प्रथक क्रमांक संपादीत करीत इंदापूर तालुक्याची मान अवघ्या महाराष्ट्रात उंचाणाऱ्या  कल्याणी माने व माने कुटुंबीयांची माजी सहकार व संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सुरवड येथील निवासस्थानी भेट घेतली आहे.तीच यथोचित सन्मान करीत तिला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान कल्याणी तुकाराम माने हिने बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयात आपले शिक्षण घेतले आहे.पुढे उच्च शिक्षण घेऊन आय.ए.एस.होण्याचं तिच स्वप्न आहे. परिस्थिती हालाखिची असली तरी मला शिक्षण घ्यायचं आहे. उच्च शिक्षण घेऊन मला भारतीय प्रशासकीय सेवेत इंदापूरचं नांव रेखाटायचं असल्याचं तिनं हर्षवर्धन पाटील यांना सांगितले.त्यावर कल्याणीची शिकण्याची धरपड व संघर्ष पाहून पाटील ही काळ भारावून गेले. त्यांनी कल्याणीचा अकरावी व बारावीचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी करेल त्यामुळे कुटुंबियांनी व तिने स्वतःही शिक्षणाची चिंता करू नये असे आश्वसन दिले.

बावडा येथील श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची इ. 10 वी.ची कल्याणी माने विद्यार्थिनी आहे. या शिक्षण संस्थेचे हर्षवर्धन पाटील हे अध्यक्ष आहेत. इतर वेगळा क्लास न लावता, विशेष मार्गदर्शन नसताना व दहा बाय दहा फुटाच्या कुडावरती पत्र्याचे छप्पर असलेल्या खोलीत राहून तिने गरीब परिस्थितीत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला ही विशेष अभिनंदनीय बाब असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. 

कल्याणी माने हीच्या राहत्या घराची स्थिती पाहून हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना माने कुटुंबीयांना घरकुल देण्याची सूचना केली. याप्रसंगी नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, संस्थेचे सचिव सरपंच किरण पाटील, दादासाहेब घोगरे, सुरेश मेहेर, सुरेश घोगरे, रावसाहेब घोगरे, दशरथ घोगरे, प्रकाश घोगरे, जी.जे.जगताप उपस्थित होते.