शहा गावात शेतकऱ्यांचे देवाला जल व दंडवत घालत जलाभिशेक आंदोलन

शहा गावात शेतकऱ्यांचे देवाला जल व दंडवत घालत  जलाभिशेक आंदोलन

इंदापूर || उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी इंदापुर तालुक्याला  देण्याच्या निर्णय  जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रद्द केल्यानंतर इंदापूर तालुक्यातील  शेतकरी संघर्ष कृती समितीने रविवारी  दिनांक २३ मे रोजी इंदापूर तालुक्यातील शहागावात उजनी जलाशयात गावातील नागरिकांनी आंदोलन करत दंडवत घालत ग्रामदैवत शंभू महादेव चरणी उजनीतील पाण्याचा अभिषेक केला व सोलापूर करांचा निषेधाच्या घोषणा  व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समर्थनार्थ घोषणा  देण्यात ही आल्या.

इंदापूर तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला असून  लोकसभा निवडणुकीत नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देणाऱ्या इंदापूर तालुक्याला पाणी प्रश्नावरून दुर्लक्षित केली जाऊ नये यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे यांनी यामध्ये लक्ष घालून इंदापूर चा पाणी प्रश्न सोडवावा अशी विनंती दिलीप पाटील यांनी केली.

या वेळी माजी सरपंच विष्णू पाटील यांच्यासह अशोक पाटील,धनाजी देवकाते,लहू निकम,संतोष कडवळे,शंकर निकम, शैलेश भोई,दिलीप नगरे,इरफान मुलाणी,पिलू गंगावणे, बाबा गंगावणे,बाबा निकम,नवनाथ गंगावणे, महादेव लांडगे,महादेव निकम, शरद भोई,अजिनाथ भोई,उमेश बनसोडे,शिवाजी तरटे, दत्तात्रय पाटील,विजय पाटील,धनाजी गंगावणे,किरण निकम, संजय निकम,भैय्या पाटील,अक्षय भोई,हनुमंत जाधव,बापू कोळी, सतिश गंगावणे,योगेश बनसोडे,भिमा निकम,मयुर कडवळे आदी शेतकरी उपस्थित होते.