कांदलगांव ग्रामपंचायतीने निर्माण केला संस्थात्मक कोवीड विलगीकरण कक्ष ; सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णावर होणार उपचार

कांदलगांव ग्रामपंचायतीने निर्माण केला संस्थात्मक कोवीड विलगीकरण कक्ष ; सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णावर होणार उपचार

इंदापूर  || सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णावर ग्रामस्तरावर विलगीकरणात ठेऊन उपचार करण्यासाठी व कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कांदलगांव ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोलीत कोरोना संस्थात्मक विलगीकरण कक्ष निर्माण केला आहे. मंगळवारी दि.11 रोजी सरपंच रवींद्र पाटील यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उपसरपंच बाळासाहेब गिरी,सदस्य तेजमाला बाबर,कमल राखुंडे,कोंडाबाई जाधव, उल्हास पाटील,किसन सरडे,दशरथ बाबर,ग्रामसेवक स्वाती चव्हाण,आशा वर्कर रुकसाना शब्बीर शेख, ग्रामपंचायत कर्मचारी पांडुरंग इंगळे,संतोष बाबर उपस्थित होते.

कांदलगांव ग्रामपंचायत परिसरातील सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णाला या विलगीकरण कक्षत ठेवण्यात येणार असून पळसदेव प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत अशा रुग्णांवर उपचार देखील करण्यात येणार आहेत.यासाठी या विलगीकरण कक्षात ग्रामपंचायतीने नऊ खाटांची व्यवस्था केली असून इतर आवश्यक त्या सुविधा ही पुरवल्या जाणार असल्याचे सरपंच रवींद्र पाटील यांनी सांगितले. शिवाय गावातील कोणीही नागरिकांनी आजार अंगावर काढू नका,आपणांस कोरोना संदर्भात कोणतीही लक्षणे जाणवल्यास तात्काळ ग्रामपंचायतीशी संपर्क साधा असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

डाॅ.बी.जी.ढवळे व डाॅ.सचिन बाबर यांनी अशा रुग्णांना सेवा देण्याची तयारी ही दर्शवली असल्याचे ग्रामसेवक स्वाती चव्हाण यांनी सांगितले आहे.