कोरोनाच्या वाढत्या संख्येला नागरिकचं जबाबदार …

कोरोनाच्या वाढत्या संख्येला नागरिकचं जबाबदार …
लाॅकडाऊन

वुहान मध्ये हे जानेवारी महिन्याच्या अखेरीस करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन अनेक मानव जातीला संक्रमण होत असल्याचे उघड झाले. भारतामध्ये करोना विषाणू चा प्रवेश मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च पासून लॉकडाऊन जाहीर केला. कोरोना विषाणूचे भीषणता समजावून सांगत प्राथमिक, माध्यमिक महाविद्यालय शाळा कॉलेज बंद करून, ज्या ज्या ठिकाणी नागरिकांचा वावर आहे अशा ठिकाणी प्रतिबंध करण्यास सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद, रेल्वे बंद व शासकीय खाजगी बस सेवा बंद करण्यात आली. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या राज्यामधून उपजिविकेसाठी गेलेले मजूर विस्थापित झाले आणि मायदेशी परतू लागले. वाहतुकीची सेवा बंद असल्याने कोणी पायी तर कोणी मिळेल त्या या साधनाचा वापर करतात मायदेशी परतू लागले. असे चित्र पाहत असताना करोना विषाणू रोखण्यासाठी खात्रीलायकचा उपाय संशोधन होत नाही त्यामुळे दररोज करोनाचे बाधित आकडे वाढताना दिसत होते. शासकीय निमशासकीय खाजगी रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल करण्यासाठी अनेक समस्या पुढे येऊ लागल्या होत्या केंद्र व राज्य सरकार रुग्णांना सुविधा देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते.

रशिया, ब्राझील, अमेरिका व भारत या देशातील संशोधक लस शोधण्यात प्रयत्नशील होते. पहिले लाॅकडॉऊन त्यानंतर दुसरे तिसरे चौथे अशा क्रमाने लॉकडाऊन सुरू असतानाच अनलॉक सुरू करण्यात आले. टप्प्याटप्प्याने वाहतूक सेवा सुरू करण्यात आली. या सगळ्या परिस्थितीमध्ये भयभीत नागरिक झाले. परप्रांतीय लोक  मायदेशी जसे परतत होती तसे राज्यात  मुंबई पुणे शहरामध्ये नोकरीसाठी पोटासाठी आलेले चाकरमानी तीही ही मंडळी आपल्या घरी परतू लागली. गावामध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले. परगाव वरून आलेले कुटुंबच्या कुटुंब शाळा खोल्यांमध्ये दहा दिवस मुक्कामासाठी राहिली. तिथे त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. कुणाच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी तर कुणाला बाधित झाल्यामुळे औषधोपचारासाठी दवाखान्यांमध्ये दाखल करण्यात आले. ऑक्सिजन लेवल कमी झाली की जास्त झाली याच्यावर चर्चा सुरू राहिल्या. दरम्यानच्या काळात देवालये, मज्तिद बंद ठेवण्यात आली. धार्मिक कार्यक्रम यावरही बंधन आहे. या साऱ्या मध्ये गोंधळ बाजूला करत नागरिकांनी स्वतःचा काही उपाय सुरू केले. कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये विवाह लावण्यात आले. पै पाहुणा इकडून तिकडून आले आणि गेले. त्यामध्ये हे काहीजण बाधित झाले. या साऱ्यांच्या तपासण्या त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा शासनाने सज्ज करायची असे सर्व सत्र सुरू होते.

अनलॉक सुरू करण्यात आले. परिवहन यंत्रणा काही प्रमाणात सुरू झाली. आता पुन्हा मात्र मायदेशी भयभीत होऊन गेलेले ते सारे पुन्हा पोटाच्या विवंचनेत वेगवेगळे राज्यातून परतू लागले. रेल्वे स्टेशन, बस अड्ड्यांवर गावाकडून परतून येणारे मजुरांचे लोंढे पुन्हा दिसू लागले. या सर्व प्रकारात करोना विषाणूंचा प्रवास इकडून तिकडे झाला नागरिकांच्या पळापळी मध्ये अनेक जण अबाधित झाले अनेक कार्यक्रमांतून कोरोना बाधित यांची संख्या वाढली. शासन प्रशासन वेळोवेळी सूचना करून सर्वांना सावध करत असतानाच भयभीत झालेल्या बेरोजगार झालेल्या लोकांमुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढली की काय असा प्रश्न उपस्थित होतो. शासनाच्या आदेशाचे पालन करून प्रत्येकाने स्वतःला सुरक्षित केली असते तर कदाचित कोरोना बाधित यांची संख्या गावागावात वाढताना दिसली नसती. नागरिकांनी विषाणूचा प्रादुर्भाव वाढवण्यासाठी चालना दिली त्यामुळे पुणे आणि मुंबई  येथे असलेले रुग्ण संख्येवर मे महिन्याच्या अखेरीपर्यंत चर्चा होती. जून महिन्यापासून राज्यात इतर ठिकाणी रुग्ण वाढू लागले. आता तर तालुका पातळीवरही दररोज शंभरच्या पट्टीत रुग्ण  आढळून येऊ लागले. आता पुन्हा जिल्हा तालुका लॉक डाऊन होणार की जनता कर्फ्यू जाहीर होणार..!