इंदापूर बसस्थानक परिसरात आढळला बेवारस मृतदेह.

इंदापूर बसस्थानक परिसरात आढळला बेवारस मृतदेह.
Deth Body

इंदापूर ता.25 : इंदापूर बसस्थानक परिसरात दि.24 रोजी सकाळी एक वेवारस मृतदेह आढळाला असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. इंदापूर पोलीसांत याबाबत  खबरी जबाब नोंदवला असून सदर मृतदेह कोणाचा आहे याबाबति इंदापूर पोलीस तपास करित आहेत.

इंदापूर शहरातील हाॅटेल चालक रमेश बापु टुले वय 37 वर्ष व्यवसाय-हॉटेल चालक (शिवाकाशिद रुग्णवाहीका चालक रा.इरिगेशन कॉलनी,इंदापुर ता.इंदापूर जि.पुणे ) यांनी याबाबत इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये खबरी जबाब नोंदवला आहे. त्यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे कि मी वरील ठिकाणी राहणेस असुन वाहन हॉटेल चालक (शिवाकाशिद रुग्णवाहीका चालक) चालवुन त्यावर कुटुंबाची उपजिवीका करतो. दि.24/08/2020 रोजी सकाळी 06/00 वा.चे सुमारास मी घरी असताना माझे मोबाईल फोनवर इंदापुर पोलीस स्टेशनचे पो. कॉ.2610 अमोल गायकवाड यांनी फोन करुन कळविले की इंदापुर बसस्थानकाचे आवारात एक बेवारस पुरुष जातीचे प्रेत अंदाजे वय 40 ते 45 वर्षाचे पडलेले असुन त्यास तात्काळ औषधोपचार कामी उपजिल्हा रुग्णालय येथे घेवुन जायचे आहे. असे कळविले  नंतर मी माझी अँम्बुलन्स नं.MH-42-M-4933 ही घेवुन बसस्थानकाचे परिसरात गेलो असता तेथे आमचे सहकारी मित्र नितीन खिलारे तसेच पोलीस स्टाफ यांचे मदतीने सदर प्रेतास अॅम्बुलन्समध्ये घेवुन उपजिल्हा रुग्णालय येथे आणले. त्यावर वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास तपासुन ते मयत असल्याचे कळविले. सदर मयताचे मरणाचे कारण समजुन येत नाही.सदर मयतास उपजिल्हा रुग्णालय इंदापुर डेड हॉउस येथे ठेवले आहे.