राहुल खोमणे यांचा वाढदीवस सामाजिक उपक्रमाने साजरा. 

राहुल खोमणे यांचा वाढदीवस सामाजिक उपक्रमाने साजरा. 

इंदापूर ता.5: शौर्य प्रतिष्ठान, इंदापुर चे सदस्य व Deepminds Infotech Pvt.Ltd व TiKTaC App चे CEO - राहुल भारत खोमणे यांचा कोरोनाच्या संकटात एक सामाजिक संदश देत वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त संपूर्ण मित्र परिवाराकडून दि.4 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासन शिव-भोजन थाळी मोफत उपलब्ध करुन देण्यात आली. याचशिवाय माऊली बालक आश्रम येथे मुलांना बिस्कीटांचे वितरण करण्यात आले. वृक्षारोपण करुन बैठक व्यवस्था बाक देखील भेट देण्यात आले. प्रितेश भैया भरणे यांच्या उपस्थितीत हा सुंदर कार्यक्रम पार पडला.

यावेळी मराठा सेवा संघाचे इंदापुर शहराध्यक्ष व शौर्य प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष - राहुलशेठ गुंडेकर, नागेश धुमाळ, ॠषिकेश काळे, सागर पवार, प्रतिक झोळ,विजय आवटे, प्रज्वल गायकवाड, कृषि पदवीधर यु.श.सं. कार्याध्यक्ष सुमित कुलकर्णी,किरण कदम,अभि ननवरे,अभिषेक कांबळे,रणजित घाडगे,अक्षय गोरड, निखील कारंडे,महेश बनकर,निखील वाघ,मंगेश बनसोडे, शंतनु बाब्रस व इतर सर्व मित्र परिवार उपस्थित होता.