इंदापूर पोलीसांची शहरातील या मांजा विक्रेत्यांवर कारवाई ; 20 हजार रुपये किमतीचा मांजा जप्त

इंदापूर पोलीसांची शहरातील या मांजा विक्रेत्यांवर कारवाई ; 20 हजार रुपये किमतीचा मांजा जप्त

इंदापूर || पक्षी व मनुष्याच्या जीवितास धोका पोहचवणाऱ्या आणि मा.मुख्य सचिव पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांनी विक्रीस बंदी घातलेल्या मांजा विक्रेत्यांवर इंदापूर पोलीसांनी कारवाई केली असून इंदापूर पोलिसात भा.दं.वि.क.188 , 336 तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम 1986 चे कलम 5,15 प्रमाणे विशाल सुरज परदेशी वय 31 राहणार मेन पेठ इंदापूर ता. इंदापूर व सुनील मधुकर इंगवले वय 47 राहणार मेन पेठ इंदापूर ता. इंदापूर यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दि.13 रोजी सकाळी साडेदहा च्या सुमारास इंदापूर शहरातील मेन पेठमध्ये  विशाल सुरज परदेशी यांच्या दुकानात पोलिसांनी छापा टाकला असता मा.मुख्य सचिव पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांनी त्याचे कडील आदेश क्रमांक सिआरटी 2015/सीआर/37 टीसी 2 दिनांक 30/3/2015 अन्वये पर्यावरण संरक्षण कायदा सन 1986 नुसार प्लास्टिक नायलन सिन्थीटीक मांजा ने पक्षी व मनुष्यास होणारे इजा (दुखापत)पासून संरक्षण व्हावे याकरिता संबंधित विक्रीस व जवळ बाळगण्यासाठी बंदी घातलेला 11 हजार रुपये किमतीचा मांजा मिळून आला. तर इंगवले जनरल स्टोअर्स नावाचे दुकानांमध्ये 9 हजार रुपये किमतीचा मांजा मिळून आला.दोन्ही दुकानात मिळून आलेला 20 हजार रुपये किमतीचा मांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे.