अरबाज शेख मित्र परिवाराने लावले गणेशोत्सवानिमित्त शेकडो वृक्ष.

अरबाज शेख मित्र परिवाराने लावले गणेशोत्सवानिमित्त शेकडो वृक्ष.
Tree planting

इंदापूर ता.24 : महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या सूचनेनुसार गणेशोत्सवाचे औचित्य साधून आज दि.24 ऑगस्ट रोजी इंदापुर शहर राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे अध्यक्ष अरबाज शेख व त्यांच्या मित्र परिवाराने क्रिडा संकुल इंदापूर येथे विविध वृक्षांचे रोपण केले.

यावेळी अभिजीत शेलार,इरफान शेख,पृथ्वीराज मोहिते, खालेद शेख,जुबेर सय्यद,अलीम शेख,आयान मिलाएं,मंदार देवकर,गणेश काळे,गौरव मिसाळ,तुषार लोंढे व इतर मित्र परिवार उपस्थित होता.

यावेळी बोलताना अरबाज शेख म्हणाले तापमानामध्ये सातत्त्याने बदल होत अाहेत. वाढत्या शहरीकरणामुळे झांडांची कत्तल झाल्याने निसर्गाचा समतोल वारंवार  ढासाळलेला आपण पाहतो. याचे दुष्परिणाम म्हणून  दुष्काळासह अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटांचा सामना सर्वांना करावा लागत आहे.यासाठी पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षलागवड ही काळाही गरज आहे. आणि त्यासाठीच आम्ही वृक्षलागवडीचे पाऊल उचलले आहे. या पुढील काळातही त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू.