इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभासदांना 12 सप्टेंबर  पासून 20 लाखाचे कर्ज वाटप सुरू

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभासदांना 12 सप्टेंबर  पासून 20 लाखाचे कर्ज वाटप सुरू

इंदापूर || इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभासदांना 12 सप्टेंबर  पासून 20 लाखाचे कर्ज वाटप सुरू करण्याचा निर्णय रविवारी दि.12 सप्टेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेतील ठरावानुसार घेण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन ज्ञानदेव चव्हाण व सचिव संजय लोहार यांनी दिली.

संस्थेचे व्हा.चेअरमन वसंत फलफले,संचालक ज्ञानदेव बागल, हरीश काळेल,सुनिल वाघ ,किरण म्हेत्रे ,नितीन वाघमोडे,संभाजी काळे,विलास शिंदे, सौ.सुनंदा बोके,सुभाष भिटे,हनुमंत दराडे,आदिनाथ धायगुडे,नानासाहेब नरुटे,बालाजी कलवले व दत्तात्रय ठोंबरे या संचालक मंडळाच्या उपस्थितीत ही सभा घेण्यात आली.

अध्यक्ष चव्हाण म्हणाले की,सभासदांना 20 लाख रुपयांचे कर्ज वाटप 9 टक्के  या अल्प व्याजदराने करण्यात येणार आहे. सभासदांना मुदत  ठेवीवर व कायम ठेवीवर 10 टक्के एवढा व्याजदर देते. तर २० लाख रुपये  कर्जावर 09 टक्के व्याजदर आकारते.संस्था पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 33 कोटी रुपये 10.50 टक्के दराने कर्ज वापरते. सभासदांना व्यापारी संकुल गाळे व सांस्कृतिक भवन यामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून आतापर्यंत 1.25 कोटी रुपये एवढा  लाभांश रुपाने परतावा देण्यात आलेला आहे.