ग्रेट सैल्यूट || त्याचा एक पाय मोडला होता,मात्र पोलिस खाकीने दाखवलेल्या प्रसंगावधानाने त्याचा जीव वाचला

ग्रेट सैल्यूट || त्याचा एक पाय मोडला होता,मात्र पोलिस खाकीने दाखवलेल्या प्रसंगावधानाने त्याचा जीव वाचला

इंदापूर || इंदापूर शहरातील सबजेल  समोर असणाऱ्या भल्या मोठ्या वृक्षावर अनेक चित्रबलाक पक्षांचे वास्तव्य आहे.शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे जो रिमझिम पाऊस आणि वादळी वारा सुटला त्यात यातील एका पक्षाला अपघात झाला. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या समय तत्परतेने या मुख्या जीवाचे प्राण वाचले आहेत.

रविवार दि.16 रोजी च्या वादळात या पक्षाला गंभीर इजा झाली. अति वेगाने सुटलेला सोसाट्याचा वारा यामुळे मोठ्या वृक्षावर वास्तव्य करणारा हा चित्रबलाक अपघाताने पहाटे जमिनीवर कोसळला. सकळी कर्तव्यावर असणारे  फौजदार सतीश ढवळे, पो. हवा. दत्तात्रय पोटे, पो. कॉ. अजित सरडे यांची नजर या चित्रबलाक कडे गेली. तो जमिनीवर तरफेचा असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला जवळ जावून पाहिले असता त्याचा एक पाय मोडला असल्याचे लक्षात आले. जर पक्षी उघड्यावर राहिला तर हिंस्त्र प्राण्याकडून त्याच्यावर हल्ला होऊ शकतो ही बाब विचारात घेऊन या कर्मचाऱ्यांनी त्याला आडोश्याला नेले.

त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी संतोष गिते यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधण्यात आला. घडलेली घडना त्यांच्या कानी घालूल पक्षाचा पाय मोडला आहे.त्याला उपचाराची गरज असून आपण त्यास ताब्यात घ्यावे असे सुचना  करण्यात आली. त्यानंतर सदर चित्रबलाक पक्षावर औषधोपचार व संरक्षण करण्याकामी त्यास वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.वनविभाग त्या पक्षावर डाॅक्टरांच्या मदतीने उपचार करणार आहे.कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्यांनी चित्रबलाक प्रति दाखवलेली जागृकता व ममता यामुळे एका मुक्या जिवाला जीवदान मिळाले आहे.