मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी इंदापूर शिवसेनेने उघडल्या विविध ठिकाणी शाखा ; पूरग्रस्तांनाही पाठवली मदत

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी इंदापूर शिवसेनेने उघडल्या विविध ठिकाणी शाखा ; पूरग्रस्तांनाही पाठवली मदत

इंदापूर || राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी इंदापूर शिवसेने तालुक्यात विविध ठिकाणी शिवसेना शाखा उघडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाचं अनोखं गिफ्ट दिलं आहे.

याचसोबत मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला अनावश्यक खर्च टाळून त्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आम्ही सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन महाड येथे धान्यकिट व इतर अत्यावश्यक मदत पुरवली असून ही मदत स्वतः शिवसैनिक पोहोच करणेकामी गेले आहेत अशी माहिती तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी दिली.