कालठण नंबर 1 मधील मनाला चटका लावणारी घटना ; बहीण-भावाने एकाच दिवशी घेतला अखेरचा निरोप. 

कालठण नंबर 1 मधील मनाला चटका लावणारी घटना ; बहीण-भावाने एकाच दिवशी घेतला अखेरचा निरोप. 
Brother and sister

इंदापूर ता.23 : इंदापूर तालुक्यात मनाला चटका लावून जणारी घटना घडली असून प्रत्येकाच्या अंतर मनाला या घटनेने स्पर्ष केला आहे.कालठण नंबर 1 येथील एकाच गावात राहणाऱ्या सख्ख्या बहीण-भावाचा दि.21 आँगस्ट रोजी एकाच दिवशी काही तासाच्या अंतराने मृत्यू झाला आहे. 

कालठण नंबर 1 येथील श्रीमती येसूबाई सपकळ वय 100 वर्षाहून अधिक होते.त्या मागील काही दिवसापासून अाजारी होत्या. त्यांचे लहान बंधू श्री रामदास चोरगे वय 97 वर्षे बहीणीला भेटण्यासाठी तीच्या घरी गेले. लाडक्या बहीणीसोबत तिच्या घरी गप्पा मारल्या, तीची विचारपूस केली आणि घराकडे परतले. मात्र त्याच दिवशी रामदास चोरगे यांचे दुख:द निधन झाले झाले. या घटनेला काही तास होतात ना तोच ज्या ताईला भेटण्यासाठी रामदास चोरगे गेले होते. त्या ताईची ही प्राणज्योत मालवल्याची बातमी समोर आली.आणि या घटनेने अनेकांच्या अंतरमनाल जखमा केल्या.  दोघे बहीण भाऊ एकाच गावात राहात असल्याने दोघांचाही अंत्यविधी एकाच वेळी करण्यात आला.शेवटच्या क्षणापर्यंत बहीण भावाचे प्रेम अतूट नाते यांचे दर्शन यातून घडले. शिवाय असा दुःखद योगायोग अनेकांच्या अंतरमनाला दुःख आणि अस्वस्थ करणारा वाटला. 

श्रीमती.येसूबाई सपकळ यांना मागील सहा महिन्यापूर्वीच रोटरी क्लब आँफ पुणे येथील रोटरियन सारंग मटाडे यांसह इतर सदस्य व प्राध्यापिका जयश्री गटकूळ,डाॅ.भास्कर गटकूळ लाभलेल्या दिघर्षायुष्याचे रहस्य समजून घेतले होते.