भिगवण येथील भूमी अभिलेख कार्यालय असून अडचण नसून खोळंबा.

भिगवण येथील भूमी अभिलेख कार्यालय असून अडचण नसून खोळंबा.
Bhigwan office

भिगवण ता.22  इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील भूमी अभिलेख कार्यालय असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे. अधिकारी व कर्मचारी हे या कार्यालयात येत नसल्यामुळे येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तरी येथील कार्यालय तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

भिगवण येथील भूमि अभिलेख कार्यालयात रोज नागरिक कामानिमित येतात पण , या कार्यालयाला गेल्या चार- पाच महिन्यांपासून टाळे टाकण्यात आले आहे. या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी येत नसल्यामुळे नागरिकांना वारावर चक्रा माराव्या लागत आहे. सध्याचे असणारे अधिकारी हे भूमि अभिलेख विभागाचे संगणकीकरण सुरू असल्यामुळे इंदापूर या ठिकाणी व्यस्त आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची कामे रेंगाळली आहेत. 

भूमी अभीलेख कार्यालयातूनच शेत जमिनीच्या मोजणी, जमिनीचे नकाशे, भूमीसंपादनाची मोजणी, न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीच्या मोजणी, खरेदी- विक्री, वारसा वाटणी नोदी व त्या संदर्भातील दाखले नमुने देण्याचे काम केले जाते. सदर भूमि अभिलेख कार्यालय असून अडचण नसून खोळंबा झाले आहे तरी हे कार्यालय तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. 

भूमि अभिलेख विभागाचे संगणकीकरण सुरू असल्यामुळे येथील कार्यालयात उपस्थित राहता येत नाही. सध्या कर्मच्याऱ्यांची कमतरता आहे. तरी देखील येथील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आठवड्यातून एक-दोन दिवस सदर कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहे.