इंदापूर शहरातील नामवंत व्यापारी जिवंधर प्रेमचंद दोशी यांचे दुख:द निधन.

इंदापूर शहरातील नामवंत व्यापारी जिवंधर प्रेमचंद दोशी  यांचे दुख:द निधन.
Jivandhar doshi

इंदापूर ता.24 : इंदापूर शहरातील जेष्ठ नागरिक जिवंधर प्रेमचंद दोशी ( वय 80 ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. इंदापूर येथील पुरातन श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरचे ते जेष्ठ विश्वस्त होते. दिगंबर जैन मुनी तसेच आर्यीका यांचे ते वैय्यावृत्त, सेवा नेहमीकरत होते. शहरातील सचोटीचा व्यापारी अशी त्यांची ओळख होती. इंदापूर येथील पार्श्वनाथ मंदिरचा जीर्णोद्धार करण्यात त्यांचे योगदान मोठे होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा नगरसेवक मिलींद दोशी, इंडिअन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेचे सदस्य डॉ.सागर दोशी, छत्रपती शिवाजी मंडळाचे कार्यकर्ते शेखर दोशी व पार्श्वनाथ युवक मंडळाचे संस्थापक मंगेश दोशी यांचे ते वडील होते.

जीवंधर दोशी यांच्या निधनाने जेष्ठ मार्गदर्शक हरपल्याची प्रतिक्रिया पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरचे अध्यक्ष अँड. अशोक कोठारी यांनी व्यक्त केले. तर फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज चे माजी अध्यक्ष डॉ. श्रेणीक शहा म्हणाले, जैन धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी भरीव योगदान दिले, बिजवडी (ता.इंदापूर ) येथे राष्ट्रीय हुमड जैन समाजाचे अधिवेशन घेण्यासाठी त्यांनी अनमोल मार्गदर्शन केले होते.

यावेळी भारतीय जैन संघटनेचे इंदापूर शहराध्यक्ष धरमचंद लोढा, जैन सोशल ग्रुप चे नरेंद्र गांधी सराफ, पारसमल बागरेचा, निलेश मोडसे, प्रकाश बलदोटा आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.