राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची सायकल स्वारी ; गो कोरोना च्या दिल्या घोषणा.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची सायकल स्वारी ; गो कोरोना च्या दिल्या घोषणा.

इंदापूर ता.29 : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रीय क्रिडा दिनी इंदापूरात सायकल स्वारी केली आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत इंदापूर सायकल क्लब कडून इंदापूर शहरात खास सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः सायकल सॉरी करत गो कोरोना गो ची घोषणा देत कोरोनाला न घाबरता व्यायामाला महत्व द्या,फिट रहा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा असा संदेश दिला आहे. शिवाय सायकल क्लब चे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विशेष कौतुक केले. 

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त इंदापूर सायकल क्लबच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन केले होते. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांनी भारताला हॉकी  खेळत ऑलम्पिक मध्ये तीन वेळा सुवर्णपदक मिळवून दिले तसेच चारशेच्या वर आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत गोल केले. त्यांच्या स्मरणार्थ 29 ऑगस्ट हा दिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. इंदापूर सायकल क्लब व युवा क्रांती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर शहरातून कोरोना व सायकल अवेरनेस रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सहभाग घेतला. तत्पूर्वी नरुटवाडी येथील मंदिरात सायकल क्लब च्या सदस्यांचा युवा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला. स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने 73 किलोमीटर सायकलिंग केलेल्या तसेच दीडशे किलोमीटर शिंगणापूर रिटर्न सायकलिंग केलेल्या सदस्यांचा युवा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर सायकल क्लब मध्ये  नव्याने सहभागी झालेल्या महिला सदस्यांचाही सन्मान करण्यात आला. 

यावेळी प्रास्ताविकपर भाषणात युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सिताप यांनी सायकल क्लबमधील सदस्यांचा सत्कार आयोजनाची आवश्यकता विशद करून  युवा क्रांती प्रतिष्ठान राबवत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमाबद्दल माहिती दिली. इंदापूर सायकल क्लबचे संस्थापक अध्यक्ष सुनील मोहिते यांनी सायकल क्लबची स्थापना, उद्देश, क्लबच्या वतीने  राबविण्यात येणारे विविध उपक्रम याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दत्तात्रय मामा भरणे यांनी युवा क्रांती प्रतिष्ठान व सायकलच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले. तसेच उपस्थितांना सायकलिंग करण्या संदर्भात आवाहन केले. 

दीर्घ पल्ल्याचे सायकलिंग केल्याबद्दल सुनील मोहिते, प्रशांत सीताप, दशरथ भोंग, रमेश शिंदे, अस्लम शेख, चांद पठाण, मेहबूब मोमीन, स्वप्नील सावंत,संजय गायकवाड, मेजर सोमवंशी,अनिल जाधव, डॉ पंकज गोरे, डॉ संजय शिंदे, डॉ ऋषिकेश गार्डे,स्वप्नील गलांडे, प्रतीक रेडके,अवधूत पाटील,उमेश राऊत,ज्ञानदेव डोंगरे, सिद्धार्थ वाघमारे,आदित्यराज मोहिते इत्यादींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी डॉ. उदय कुरुडकर, डॉ. लक्ष्मण सपकळ,आनंद देशपांडे, तुकाराम बानकर, कुशल कोकाटे, सचिन परबते, बाळासाहेब वेदपाठक, प्रितेश भरणे,विनायक वाघमारे इत्यादींचे सहकार्य लाभले. रमेश शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कुशन कोकाटे यांनी आभार मानले.