महागाईला तोंड देणाऱ्या ग्राहकांना एकामागून एक धक्के ; दूध विक्री दरात वाढ

महागाईला तोंड देणाऱ्या ग्राहकांना एकामागून एक धक्के  ; दूध विक्री दरात वाढ

नवी दिल्ली || कोरोना संकटाच्या काळात महागाईला तोंड देणाऱ्या ग्राहकांना एकामागून एक धक्के बसत आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत असताना आता दूध दरांमध्ये ही वाढ होत आहे. अमूल पाठोपाठ मदर डेअरीने देखील दूध विक्री दरामध्ये दोन रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. आता मदर डेअरीच्या दूध उत्पादनाच्या विविध पदार्थांच्या किमतीमध्ये ही 2 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे.त्यामुळे आजपासून मदर डेअरीचे दूध खरेदी करण्यासाठी ग्रसहकांना दोन रुपये जादा मोजावे लागणार आहेत.

इंधन दर आणि विजेचे दर वाढल्यामुळे दूध उत्पादक संघाचा देखील खर्च वाढला असल्याचे कारण देत दूध संघांकडून दूध दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. एक जुलै रोजी अमूलने दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात येथे एक जुलैपासून अमूलचे दूध उत्पादन महागली. अमूलच्या निर्णयाच्या पाठोपाठ मदर डेअरीने देखील दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांना 11 जुलैपासून म्हैशीच्या दूध खरेदी दरात दोन रुपये आणि गायीच्या दुधाच्या दरात 1 रुपयाची वाढ करत असल्याची घोषणा सतेज पाटील यांनी केली.कोल्हापूर वगळता राज्यातील इतर भागात दूध विक्री दरातही 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने मुंबईसह राज्यात  ग्राहकांना गोकुळ दूध खरेदीसाठी अधिकचै पैसे मोजावे लागणार आहेत.