पर्यावरण संरक्षणासाठी तेजपृथ्वी ग्रुप ने उचलले महत्वपूर्ण पाऊल ; भवानीनगर पासून नव्या उपक्रमाची सुरवात

पर्यावरण संरक्षणासाठी तेजपृथ्वी ग्रुप ने उचलले महत्वपूर्ण पाऊल ; भवानीनगर पासून नव्या उपक्रमाची सुरवात

इंदापूर || पर्यावरण संरक्षणाला महत्व देत इंदापूर तालुक्यातील तेजपृथ्वी ग्रुप ने नवीन संकल्पना राबवण्यास मंगळवार दि.07 पासून सुरवात केलीय.

तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सौ. अनिताताई नानासाहेब खरात,मार्गदर्शक महेंद्ररेडके व  नानासाहेब खरात यांच्या मार्गदर्शनाखाली महिला तालुकाध्यक्षा अर्चना गोरड व तालुकाध्यक्ष राहुल रामचंद्र नाकाडे यांच्या माध्यमातून "झाडे लावा- झाडे जगवा" अभियान राबवण्यात येणार आहे.

या संकल्पनेतून अशोकनगर उपकेंद्र आशासेविका, आरोग्य कर्मचारी सारिका गौतम लोंढे व अंगणवाडी सेविका सुनंदा संजय गायकवाड यांच्या हस्ते बाळंत झालेल्या मातेला एक वृक्ष भेट देण्यात आला. तुम्ही तुमच्या जसं बाळाला जपणार आहे,तसं या झाडालाही जपा आणि प्रेम देऊन वाढवा असा संदेश देण्यात आला.

तेजपृथ्वी  ग्रुपच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपनावर भर देण्यात येत आहे. झाडे ही आँक्सिजनचा पुरवठा करतात,पर्यावरणाचा समतोल राखतात त्यामुळे झाडे ही आपले मित्र आहेत.ते वाढविण्यासाठी आम्ही मंगळवार दि.07 सप्टेंबर पासून भवानीनगर येथून सुरवात केली असल्याचे  तेजपृथ्वी ग्रुपचे इंदापूर तालुकाध्यक्ष राहुल नाकाडे यांनी सांगितले आहे.