हनीट्रॅप च्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश ; तिघांना अटक  

हनीट्रॅप च्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश ; तिघांना अटक  

सातारा 02// अश्लील व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल करण्याची धमकी देत प्रतिष्ठित लोकांना वेठीस धरत हनीट्रॅपच्या जाळ्यात अडवणाऱ्या टोळीला सातारा तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. काजल प्रदीप मुळेकर, अजिंक्य रावसाहेब नाळे, वैभव प्रकाश नाळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

यात एका महिलेचा समावेश असून, या टोळीने सातारा, पुणे, बारामती, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठित लोकांची लुट केल्याचे समोर येत आहे. या तिघांनाही चार दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.

सातारा जिल्ह्यातील एका व्यावसायिकाला एक वर्षापूर्वी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडवकून त्याची  लुट करण्यात आली होती.एका महिलेने या व्यवसायिकाला मोबाइलवर अश्लील संदेश पाठविला, त्यानंतर या व्यावसायिकाच्या  भेटीसाठी ही महिला सातारा बसस्थानकात आली. व्यावसायिक व महिला कारने ठोसेघर येथे गेले, तेथील एका हॉटेलमध्ये बसले असताना,या महिलेचे भाऊ म्हणून तीन ते चारजण व्यक्ती त्या हाॅटेल मध्ये दाखल झाले.त्यांनी या व्यावसायिकाला मारहाण केली. त्याला त्याच्या गाडीतून सातारा येथे आणले. तुझे अश्लील व्हिडिओ आमच्याकडे असून, हे प्रकरण मिटविण्यासाठी पैशाची मागणी केली. त्यावर या प्रकरणावर पडदा टाकलण्यासाठी व्यावसायिकाने या टोळीला सहा लाखाची रोकड, सोने, चांदी सह स्वत:ची कारही दिली. बारामती शेजारील फलटण येथे ही कार बेवारस स्थितीत पोलिसांना आढळून आली. चौकशी अंती पोलीस संबंधित व्यावसायिकापर्यंत पोहोचले आणि त्यामधून ही धक्कादायक माहिती प्राप्त झाली. या जाळ्यात विविध ठिकाणचे अनेक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.