भिगवण व परिसरात विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस - शेतकऱ्यांची तारांबळ

भिगवण व परिसरात विजेच्या कडकडासह  मुसळधार पाऊस - शेतकऱ्यांची तारांबळ

भिगवण (विजयकुमार गायकवाड) || पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात सर्वात मोठा मुसळदार पाऊस उजनी लाभक्षेत्रातील भिगवण (ता. इंदापुर )परिसरात शुक्रवार ता.1 ऑक्टोंबर  रोजी मध्यरात्री  झाला.

गेल्या महिन्या दीड महिन्यापासुन पावसाने मोठा ब्रेक घेतला होता यंदाच्या पावसाळ्याच्या अद्याप पर्यंत रिमझिम पाऊसाव्यतिरिक्त मोठा पाऊस झाला नव्हता.मात्र शुक्रवार (ता.1) रोजी सायंकाळी साडेदहाच्या दरम्यान पावसाने जोरदार व दमदार हजेरी लावत सगळीकडे पाणी पाणी केले.

परिसरातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता.एका मागोमाग एक नक्षत्र कोरडी जात होती गौरी गणपतीच्या सणाच्या काळातही पावसाने गुंगारा दिला होता त्यामुळे बळीराजा मध्ये चिंतेचे वातावरण होते काल सकाळपासुनच वातावरणात गरमी निर्माण झाली होती  मोठ्या व दमदार पावसाची संकेतही दिसत होती त्यातच सायंकाळी साडेदहाच्या दरम्यान पावसाचे आगमन झाले हा दमदार पाऊस रात्रभर पडत होता  या पावसाने चिखल मात्र झाला नाही परंतु उसाच्या सरी मध्ये पाणी साचले आहे.तसेच वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे.परिसरातील भिगवणसह डिकसळ , राजेगाव ,खानोठा, तक्रारवाडी, कुंभारगाव ,मदनवाडी, चिंचोली ,पोंधवडी आदी ठिकाणी पाऊस झाल्याचे वृत्त आहे.

या दमदार पावसामुळे  शेत शिवारातील कटवळ, मका या पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले असुन ऊस पिकाच्या वाढीस अधिक पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न सुद्धा मार्गी लागला आहे. मात्र अचानक मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असुन शेतामध्ये काढून ठेवलेल्या कांदा, मका आदी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.