अमोल इंगळे मित्रपरिवाराच्या वतीने श्रावण बाळ आश्रमात हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस साजरा

अमोल इंगळे मित्रपरिवाराच्या वतीने श्रावण बाळ आश्रमात हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस साजरा

इंदापूर || इंदापूर येथील श्रीराम मंदिर या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांच्या ५८ व्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त भाजपाचे युवा नेते अमोल इंगळे मित्र परिवार यांच्या वतीने श्रावण बाळ आश्रम शाळेत इडली बनवण्याचे साहित्य , खाऊ फळे इत्यादी देऊन श्रावण बाळ आश्रमतील मुलांच्या हस्ते केक कापून अभिष्टचिंतन दिन साजरा करण्यात आला.

पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सामाजिक राजकीय ,सांस्कृतिक क्षेत्रात भरभरून उन्नती व्हावी. त्यांचे जीवनमान उंचवावे . तसेच अनाथाश्रमातील मुलांना खाऊ वाटप, फळे वाटप, तसेच त्यांना उपयोगी असणारे साहित्य देऊन केक कापून अभिष्टचिंतन दिन साजरा करावयास मिळाले हे आमचे भाग्य समजतो व त्यांना अभिष्ट चिंतनाच्या  माझ्या व मित्र परिवाराच्या  वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो.अस प्रतिपादन भाजपाचे युवा नेते अमोल इंगळे यांनी केले.
 
यावेळी भाजपा युवा नेते अमोल इंगळे, सुरज विर, अजित गायकवाड,सागर आवटे, तात्याराम पवार, भारत आसबे यशराज औताडे , किरण यादव, कैलास  सटाले, गणेश फलफले, मंगेश गोपलकर, विशाल मेंगडे,  विशाल खराडे महाराज इत्यादी उपस्थित होते.