हर्षवर्धन पाटील यांनी घेतली नुकसानग्रस्त शेतकरी संजय शेलार यांची भेट ; 10 हजार मत्स्यबीज मोफत देण्याचे आश्वासन

हर्षवर्धन पाटील यांनी घेतली  नुकसानग्रस्त शेतकरी संजय शेलार यांची भेट ; 10 हजार मत्स्यबीज मोफत देण्याचे आश्वासन

इंदापूर || पळसदेव परिसरातील शेलार पट्टा येथील शेतकरी संजय एकनाथ शेलार यांच्या शेततळ्यात कोणीतरी अज्ञाताने विषारी औषध टाकल्याने अंदाजे पाच टन माशांचा मृत्यू झाला.शेलार यांचे यामुळे जवळपास पाच लाख रूपयाचे नुकसान झाले. 

या घटनेनंतर बुधवार दि.25 रोजी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शेलार यांची प्रत्यक्षात भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला या संकटातून त्यांनी पुन्हा सावरण्यासाठी आणि आपला व्यवसाय पुन्हा जोमाने उभारण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  पळसदेवच्या माजी ग्रामपंचायत सदस्य सौ.सुरेखा शरद काळे यांकडून  पुढील दोन दिवसात शेलार यांना 10 हजार मत्स्य बीज मोफत देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. 

09 ऑगस्टच्या संध्याकाळी अज्ञातांकडून संजय शेलार यांच्या मत्स्यशेत तळ्यात विषारी औषध टाकण्यात आले, त्यामुळे शेलार यांनी पैदास केलेले ५ टन माशांचा मृत्यू झाला होता. मोठ्या कष्टाने, नियमित खाद्य व औषधांची पूर्तता करुन शेलार यांनी या तळ्यात मासे वाढवले होते. परंतु काही समाजकंटकांच्या कारस्थानाने ही घटना घडली होती.याचे आम्हालाही दुख: आहे असं हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.मात्र झालेल्या घटनेला धरुन न राहता शेलार यांनी यातून सावरून पुन्हा आपला व्यवसाय उभारावा असही ते म्हणाले आहेत.यावेळी पै.पिंटु काळे,भूषण काळे,मधुकर रंधवे,माजी संचालक शरद काळे,दादा शेलार यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.