आद्यक्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांना कांदलगावात जयंतीनिमित्त अभिवादन

आद्यक्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांना कांदलगावात जयंतीनिमित्त अभिवादन

इंदापूर || मंगळवारी दि.07 रोजी कांदलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आद्यक्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उमाजीराजेंच्या प्रतिमेचे पूजन सरपंच रविंद्र पाटील व उपसरपंच तेजमाला बाबर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना सरपंच रविंद्र पाटील म्हणाले की,आद्यक्रांतीवीर उमाजीराजे नाईक हे क्रांतीचा प्रेरणास्त्रोत आहेत,तरूणांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशोपयोगी कार्य करणे गरजेचे आहे.

यावेळी उपसरपंच तेजमाला बाबर,रेखा बाबर,कमल राखुंडे,कोंडाबाई जाधव,किसन सरडे,उल्हास पाटील,विजय सोनवणे, बाळू गिरी,दशरथ बाबर,ग्रामसेविका स्वाती चव्हाण, विकास मदने,उमेश ननवरे समीर शेख, सौरभ जाधव,भाऊसो मदने, बाबा मदने समाधान मदने ,सचिन मदने, उमेश ननवरे, निलेश राखुंडे, सहदेव सरडे, शिलाजीत सोनवणे, रविंद्र बाबर, विकास मदने, अजित मदने आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी केले व आभार पांडुरंग इंगळे यांनी मानले.