सरडेवाडी ग्रामपंचायतमध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन 

सरडेवाडी ग्रामपंचायतमध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन 

इंदापूर 19 // सरडेवाडी ग्रामपंचायत च्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती साजरी करण्यात आली. सरपंच सिताराम जानकर व उपसरपंच हनुमंत जमदाडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य रविंद्र सरडे, सतीश चित्राव, गोकुळ कोकरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते आप्पा माने, बळीराम जानकर, प्रशांत सरडे, विजय शिद,संजय चित्राव, किशोर कडाळे, ग्रामसेवीका स्वाती चव्हाण उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी केले.