पवित्र ईद निमित्त बंधुत्वाचा संदेश देऊ या, विश्व बंधुत्व वाढीस लावू या…माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या शुभेच्छा

पवित्र ईद निमित्त बंधुत्वाचा संदेश देऊ या, विश्व बंधुत्व वाढीस लावू या…माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या शुभेच्छा

इंदापूर ||  समता, एकता व बलिदानाचे प्रतीक असलेला ईद-उल-अजहा म्हणजे बकरी ईद हा इस्लाम धर्मियांचा एक महत्वाचा सण आहे. ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद, समृद्धी लाभो  अशा शब्दांत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यानी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या बुधवारी ( दि.21) रोजी शुभेच्छा दिल्या.

हर्षवर्धन पाटील म्हणाले,की पवित्र बकरी ईद निमित्त आनंद, सुख, संपत्ती लाभो, तुमच्या घरात ऐश्वर्य, समृद्धी नांदो.बकरी ईद ( ईद -ए- कुर्बान) म्हणजे हजरत इब्राहिम (अ.) यांनी मानवतेसाठी जे महान कार्य केले त्यांचे स्मरण व सन्मान केला जातो. ईद -ए- कुर्बान हा सण त्याग, सेवा, समर्पण व बलिदानाच्या भावनेचा आहे. त्यातून वर्षभर ऊर्जेच्या रूपामध्ये सामाजिक व परमार्थिक कार्यासाठी प्रेरणा मिळते. पवित्र ईद निमित्त बंधुत्वाचा संदेश देऊ या, विश्व बंधुत्व वाढीस लावू या. मानवतेची सेवा घडावी हाच उद्देश सण, उत्सव साजरा करणे पाठीमागे आहे, असे त्यांनी नमूद केले.