वालचंदनगर पोलीस ठाण्याअंतर्गत राबवण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास भरघोस प्रतिसाद  

वालचंदनगर पोलीस ठाण्याअंतर्गत राबवण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास भरघोस प्रतिसाद  

इंदापूर || पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक बारामती मिलींद मोहीते, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या सहकार्यातून शिवशंभो चारिटेबल ट्रस्ट व वालचंदनगर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.14 रोजी वालचंदनगर पोलीस स्टेशन आवारात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात तब्बल २८० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवल्याची माहिती सहा पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर यांनी दिली.

सकाळी ९ ते ५ वेळेत आयोजित केलेल्या या शबिरात आयोजकांच्या माध्यमातून प्रत्येक रक्तदात्यास १ हेल्मेट व प्रमाणपत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एन.लातुरे,पोलीस अधिकारी,अंमलदार यांचे हस्ते देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.विशेष म्हणजे या रक्तदान शिबीरात सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एन.लातुरे यांसह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

यावेळी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरिक्षक बी.एन .लातुरे, पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे,पोलीस उपनिरीक्षक नितीन लकडे, सहा पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर, विनोद पवार, अंमलदार,पोलीस कर्मचारी यांसह विविध गावचे सरपंच, उपसरपंच व युवक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.