बसच्या मागील चाकाखाली चिरडल्याने आजीचा जागीच मृत्यू .

बसच्या मागील चाकाखाली चिरडल्याने आजीचा जागीच मृत्यू .

बीड 03 //  केज येथील उपजिल्हा रुग्णालया समोर एका वृद्ध महिलेच्या डोक्यावरून एसटीचे मागचे चाक गेल्यामुळे तिचा तिचा जागीच मृत्यू झाला.हि घटना मंगळवार (दि. 2 फेब्रु.) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. काशीबाई रामभाऊ थोरात (वय 65 वर्षे), असे मृत महिलेचे नाव आहे.

मंगळवार दि. 2 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास काशीबाई या रिक्षातून आपल्या गावाकडे जात होत्या. त्याच दरम्यान उपजिल्हा रुग्णालयासमोर रिक्षातून तोल जाऊन त्या रिक्षाबाहेर पडल्या. दरम्यान बीड आगाराची अंबाजोगाई-बीड शिवशाही बस (क्र. एम एच 09 एफ एल 1042) त्यांना खेटूनच निघाली होती.काशीबाई या अचानक तोल जावून कोसळल्याने त्या बसच्या मागील चाकाखाली चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.