आषाढी वारी निमित्त गलांडवाडी क्र.1 मध्ये काढली ग्रामदिंडी ; महिलांसह बाळगोपाळांचा समावेश

आषाढी वारी निमित्त  गलांडवाडी क्र.1 मध्ये काढली  ग्रामदिंडी ; महिलांसह बाळगोपाळांचा समावेश

इंदापूर || लाखो वारकरी भाविक भक्त आषाढी वारीमध्ये सहभागी होऊन, संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा संपन्न होत असतो. यंदा मात्र सलग दुसऱ्या वर्षी कोरोना महामारीमुळे या लाखो वैष्णवांच्या आनंदावर विरजन पडले आहे.

परंपरागत चालणाऱ्या या सोहळ्यात प्रत्येक वर्षी टाळ मृदुंगाच्या गजरात "पुंडलिका वरदे हरी विठ्ठल " च्या नामघोषात आषाडी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्यात गलांडवाडी क्र 1 ता. इंदापुर येथुन शेकडो वारकरी सहभागी होत असतात.यंदा मात्र ही संधी पुन्हा हुकली.आहे त्या स्थितीत हा आनंद व्दिगुनीत करण्यासाठी आषाडी एकादशी निमित्त व्यसनमुक्त युवक संघ, भजनी मंडळी व  वारकरी यांनी एकत्र येत वारकरी पोषाख परिधान करीत,कपाळी चंदन बुका टीळा लावून गावातच भव्य ग्रामदिंडी काढत आषाढी साजरी केली. 

यावेळी ह.भ.प.सदाशिव गलांडे, ह.भ.प.वसंत कदम, ह.भ.प.ईश्वर फलफले,ह.भ.प.विजयकुमार फलफले सर,व्यसनमुक्त युवक संघ इंदापुर तालुका अध्यक्ष डाॅ.सुदिप ओहोळ, मृदुंगाचार्य ओंकार कदम, मृदुंगाचार्य हरी फलफले, विजय फलफले, शुभम कचरे, गायनाचार्य मिनीनाथ फलफले,लालासो कचरे, रोहन तानवडे, दत्तू जाधव, गणेश मोरे,अनंता फलफले,शिवाजी जाधव, राजेंद्र फलफले, साहेबराव कदम, दशरथ मोरे, गंगाराम शेवते,भागवत फलफले, रामभाऊ बोडके,सोपान वाघमारे,शंकर फलफले, देविदास गलांडे, बाळासाहेब फलफले यांसह तसेच बालक भक्त आणि माता भगिनी या भव्य पवित्र ग्राम दिंडिसोहळ्यात सामिल झाल्या होत्या.