शिरूर-सातारा महामार्गावर वाहन चालकांना लुटणारी टोळी गजाआड

शिरूर-सातारा महामार्गावर वाहन चालकांना लुटणारी टोळी गजाआड

शिरुर // शिरूर तालुक्यातील शिरूर-सातारा राज्य मार्गावर आंधळगाव (ता.शिरूर) येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या व आलिशान गाडीतून वाहनचालकांना लुटणाऱ्या टोळीला  सिने स्टाईल पध्दतीने पाठलाग करत चौफुला येथे जेरबंद करण्यात शिरूर पोलिस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे.भाऊसाहेब उर्फ अण्णा मधुकर फडके (वय 32 रा. कानगाव ता. दौंड जि. पुणे), अनिल हनुमंत चव्हाण (वय 19 वर्षे कानगाव ता. दौंड जि. पुणे)या दोघांसह एका अल्पवयीन आरोपीचा यात समावेश आहे

यामध्ये अल्पवयीन आरोपीसह तीन आरोपीचा समावेश आहे.सिने स्टाईल पाठलाग करून या आरोपींना पोलिसांनी  अटक केली. तर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार होण्यात यशस्वी झाले.पकडलेल्या आरोपींकडून छऱ्याची बंदुक,एक तलवार, दोन लाकडी दांडके, दोन नकली गाड्यांच्या नंबर प्लेट, व एक फॉर्च्युनर कार असा 25 लाख 18 हजार 650 ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.