राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी इंदापूरचे गणेश भोंग

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी इंदापूरचे गणेश भोंग

इंदापूर || राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी इंदापूरचे गणेश भोंग यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन आनंदराव घोटकुले यांच्या सहीचे नियुक्तीपत्र बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश भोंग यांना देण्यात आले.

आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याविषयी असलेली निष्ठा यामुळे आपण आजवर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदर सौ.सुप्रिया सुळे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून समाजकारण करत आला आहात.

आपल्या समाजकारणाला राजकीय पदाचे बळ मिळावे म्हणून आपली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती करीत आहे. जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असताना आपण पक्षाचा व युवक संघटनेचा अधिकाधिक विस्तार करून दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडावी. पक्षाचे राष्ट्रीय  सामाजिक समतेथे विचार समाजातील तळागळात पोहोचविण्याचा प्रयत्न करावा असे देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे.