ऊसतोड मजूर पुरवतो म्हणत 5 लाख 81 हजार रूपयांची फसवणूक ; भिगवण पोलिसांत गुन्हा दाखल

ऊसतोड मजूर पुरवतो म्हणत 5 लाख 81 हजार रूपयांची फसवणूक ; भिगवण पोलिसांत गुन्हा दाखल

इंदापूर || उसतोडणी मजुर पुरवितो असे सांगत 2013 सालापासून आजपर्यंत डिकसळ येथील भास्कर बाबुराव काळे यांकडून 3 लाख 56 हजार रुपये व मदनवाडी येथील विश्वास रंगनाथ देवकाते यांचेकडुन 2 लाख 25 हजार रुपये असे एकुण 5 लाख 81 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी भिगवण पोलिसांत दि.08 जुलै रोजी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भास्कर बाबुराव काळे वय 65 वर्ष रा.डिकसळ ता.इंदापुर यांच्या फिर्यादीवरुन आरोपी सिताराम सोमा मोरे, दिलीप भाऊसाहेब सोनवणे व महीलाआरोपी कमल सिताराम मोरे सर्व रा.धाडणे ता.साक्री जि.धुळे यांविरूद्ध भिगवण पोलिसात भा.द.वि.का.क .420,406,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील आरोपींनी विश्वास देऊन रोख स्वरुपात रक्कम घेवुन त्यांनी फिर्यादीला उसतोडणी मजुर न पुरविता फिर्यादीचा विश्वासघात करुन फसवणुक केली आहे.या कारणावरून भिगवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली पो.उ.नि.विनायक दडस-पाटील करित आहेत.

भिगवण आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याची शक्यता असून भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने मी आवाहन करतो की फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा त्यांना न्याय देण्यासाठी पोलिस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल - प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक,जीवन माने