कोरोना पार्श्वभूमीवर बिजवडी येथे रुग्णकल्याण समितीची बैठक संपन्न

कोरोना पार्श्वभूमीवर बिजवडी येथे रुग्णकल्याण समितीची बैठक संपन्न

इंदापूर || कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिकांच्या स्वास्थ्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाय योजना राबविण्यात येत आहेत, इंदापूर तालुक्यातही याबाबत युध्दपातळीवर कामे सुरू आहेत.सोमवार दि.17 रोजी पुणे जिल्हा परिषद बांधकाम आरोग्य समितीचे मा. सभापती प्रविण माने यांच्या अध्यक्षतेखाली इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णकल्याण समितीची बैठक पार पडली. 

या बैठकीला मोहन दुधाळ, इंदापूर पं.स.माजी उपसभापती देवराज जाधव, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील गावडे, बिजवडी सरपंच दादाराम काळेल, पोलीस पाटील रेश्माताई भिसे, डॉ.सौ.चंदनशिवे , समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व इतर मान्यवर उपस्थित होते.

या मिटिंगमध्ये आरोग्य केंद्रावरील इतर सोयी सुविधांसह कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.कोरोना लसीकरण मोहीम, आरोग्य केंद्रावर नागरिक व डॉक्टर कर्मचारी यांची होणारी गैरसोय त्यावर उपाय योजना अशा विविध विषयांवर आजच्या मिटिंगमध्ये चर्चा करण्यात आली. आपल्या संपूर्ण देशावर हे संकट ओढावले असून आपण सर्वांनीच आपले कर्तव्य पणाला लावून कार्यरत राहणे ही काळाची गरज असल्याचे मत माने यांनी व्यक्त केले.

भविष्यकाळाची पावले ओळखून लसीकरण मोहीम वाढवणे, औषधसाठा खरेदी करणे, कामकाजासाठी किरकोळ खरेदी, लोकांसाठी पाण्याचे जीआर आणने, पिण्याच्या पाणी साठी नवीन फिल्टर खरेदी याबाबतही चर्चा करून निर्णय घेण्यात आले. मागील मिटिंगमध्ये प्रविण माने यांनी सूचना केल्याप्रमाणे लांबून-लांबून येणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्य केंद्रावर मंडप टाकण्याविषयी सूचना केल्या होत्या, त्याची पूर्तता झाल्याचे यावेळी निदर्शनास आले.