दारू मिळेना म्हणून मारला सॅनिटाझरचाचं पॅक ; पाच जणांचा मृत्यू

दारू मिळेना म्हणून मारला सॅनिटाझरचाचं पॅक ; पाच जणांचा मृत्यू

यवतमाळ || राज्यात कोरोना कहर सुरुयं. कोरोनाला अटकाव करण्यासाठी कडक निर्बंध लावल्याने दारूची दुकाने बंद आहेत. मात्र दारूची तलप भागविण्यासाठी तळीरामांनी चक्क सॅनिटायझर पिल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना वणी येथे घडली आहे. दत्ता लांजेवार, नूतन पाथरटकर, गणेश शेलार, संतोष मेहर आणि सुनील ढेंगळे अशी मृतांची नावे आहेत. 

शुक्रवारी सायंकाळी दोन व्यक्तींचा सॅनिटायझर पिल्यामुळे मृत्यू झाला. तर आणखी तिघांचा सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाला आहे. वणी शहरातील तेली फैलमधील दत्ता लांजेवार (वय 47) यांनी रात्री 9 च्या दरम्यान आपली दारूची तलप सॅनिटायझरवर भागवली. त्यानंतर रात्री दहा वाजता त्याच्या छातीत त्रास होऊ लागला. त्यांना उपचार कामी वणी ग्रामीण रुग्णालयात भर्ती करण्यात आले. मात्र रात्री 11 वाजताच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

याशिवाय नूतन पाथरकर (वय 33) याचाही सॅनिटायझर पिऊन मृत्यू झाला. रात्री सॅनिटायझर पिल्यानंतर त्रास होत असल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्याने तेथून पळ काढला आणि त्याचा मृत्यू झाला. तर वणीच्या एकतानगर येथील संतोष मेहर याने सुद्धा सॅनिटायझर प्राशन केल्याने पहाटे 3.30 वाजता त्याचा  मृत्यू झाला. याशिवाय गणेश शेलार आणि सुनील ढेंगळे यांचा सुद्धा रात्री सॅनिटायझ प्राशन केल्याने घरीच मृत्यू झाला आहे.