18 हजार 300 रुपये दंड वसूलीसह शहरातील 3 आस्थापनांवर गुन्हा दाखल ; इंदापूर पोलिसांची कारवाई

18 हजार 300 रुपये दंड वसूलीसह शहरातील 3 आस्थापनांवर गुन्हा दाखल ; इंदापूर पोलिसांची कारवाई

इंदापूर || कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 मे पर्यंत लाॅकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. अत्यावश्यक असणाऱ्या महत्वाच्या आस्थापना या ठराविक वेळेपर्यंत चालू ठेवण्यास परवाणगी देण्यात आली आहे.मात्र त्यासाठी काही निर्बंध देखील लावण्यात आले आहेत.

याचे काटेकोर पणे पालन करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शुक्रवार दि.07 रोजी सकाळी 11 वाजता तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर पोलिसांनी शहरातून पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च काढला. त्यांनंतर विशेष ड्राइव्ह घेण्यात आला.

इंदापूर पोलीसांनी घेतलेल्या विशेष ड्राईव्हमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याने एकूण 3 आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात आले ,तर विना मास्क शहरातून संचार करणाऱ्या 15 नागरिकांवर कारवाई करून 7500 रुपये दंड वसूल करण्यात आला.तर एकावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. Mv act नुसार 40 कारवाई करून 10 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. इंदापूर पोलीसांनी केलेल्या आजच्या कारवाईत एकूण 3 गुन्हे व 18 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.