कोठळीत प्रेम प्रकरणावरून दोन गटात मरामारी ; एकमेकांविरुध्द इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल

कोठळीत प्रेम प्रकरणावरून दोन गटात मरामारी ; एकमेकांविरुध्द इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल

इंदापूर || आपल्या मुलीशी गावातीलच एका विवाहीत पुरुषाचे प्रेम संबंध असून त्याचा राग काढत सबंधित मुलाच्या घरी मद्यपान केलेल्या अवस्थेत जावून पुरुषाच्या आईसह सुनेला शिविगाळ व चाकूने पाठीत वार केल्याचा प्रकार इंदापूर तालुक्यातील कौठळी गावात शुक्रवारी दि.02 जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता घडला असून शनिवारी दि.03 रोजी रात्री उशीरा इंदापूर पोलिसांत नऊ जनांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी ताई दादा भंडलकर वय 55 वर्षे या महिलेच्या तक्रारीवरुन इंदापूर पोलिसांत शनिवारी उशिरा भा.द.वि.324 व अन्य कलमांन्वये आरोपी ज्ञानदेव आण्णा मारकड,पुष्पा ज्ञानदेव मारकड,शिवाजी ज्ञानदेव मारकड,नवनाथ ज्ञानदेव मारकड,विलास तुकाराम मारकड, गजानन तुकाराम मारकड,मंगेश तुकाराम मारकड, बंटी गजानन मारकड,सुनिल दत्तु मारकड सर्व रा. कौठळी बळपुढी शीव महादेवनगर ता. इंदापुर जि.पुणे यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर उलटपक्षी उलट पक्षी आरोपी चंदुलाल दादा भंडलकर याने गैर कायद्याची मंडळी जमवत मारकड यांच्या घरी जावून तुमची मुलगी व माझे लफडे असल्याचे सांगत लोखंडी गजाने मारहाण करुन सासरे ज्ञानदेव मारकड हे जखमी केल्याची फिर्याद अर्चना शिवाजी मारकड वय 30 वर्ष रा.कौठळी बळपुडी शिव ता.इंदापूर यांनी शनिवारी दि.03 रोजी दिली आहे. 

अर्चना मारकड यांच्या  तक्रारीवरुन आरोपी चंदुलाल दादा भंडलकर, दादा शंकर भंडलकर, नंदुलाल दादा भंडलकर,ताई दादा भंडलकर, मोहिनी चंदुलाल भंडलकर, हनुमंत शंकर भंडलकर, तुकाराम हनुमंत भंडलकर, ज्ञानदेव सुभाष भंडलकर, नामदेव हनुमंत भंडलकर ,किशोर सुभाष भंडलकर, प्रकाश शंकर भंडलकर, विठ्ठल प्रकाश भड़लकर सर्व रा. कौठळी ता. इंदापुर जि.पुणे यांविरुध्द इंदापूर पोलिसांत गु.रजि नं - 621/2021 भादवि 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी ताई भंडलकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे,की दि.02 जुलै रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान आम्ही सासू-सुना घरी असताना आरोपी ज्ञानदेव अण्णा मारकड याने मद्यपान करुन घरी आले.तुझ्या मुलाचे चंदुलाल चे माझ्या मुली बरोबर प्रेम संबंध आहेत,तुझा मुलगा कुठे आहे ? अशी विचारणा केली तर आरोपीच्या पत्नीने शिवीगाळ केली याच दरम्यान नवनाथ मारकड व विलास मारकड याने फिर्यादी ताई भंडलकर यांच्या पाठीवर वार केले. तर आरोपी ज्ञानदेव  मारकड,शिवाजी मारकड,गजानन मारकड,मंगेश मारकड व सुनिल मारकड यांनी काठ्याने तसेच लोखंडी गजाने पाठीवर मांडीवर आणि कंबरेवर मारहाण केली.

याच दरम्यान भांडणे  सोडवण्यासाठी फिर्यादी यांचा मुलगा नंदुलाल दादा भंडलकर हा आला असता यातील आरोपी मंगेश मारकड, बंटी मारकड,सुनिल मारकड यांनी त्यास काठीने मारहाण केली.तर सूनेस धक्काबुक्की केली अशा आशयाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तर फिर्यादी अर्चना मारकड यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे,की दि.02 जुलै रोजी रात्री साडेदहा च्या दरम्यान आमचे राहते घरासमोर आरोपी चंदुलाल भंडलकर याने गैर कायद्याची मंडळी जमवली. माझे सासरे ज्ञानदेव आण्णा मारकड यांना म्हणाला की तुमची मुलगी व माझे लफडे आहे. यावर सासरे ज्ञानदेव आण्णा मारकड म्हणाले की तू माझे पोरीला ताप देऊ नको, तू माझे पोरीचे वाटोळे केले आहे.यानंतर आरोपी चंदुलाल भंडलकर,दादा भंडलकर,नंदुलाल भंडलकर,ताई भंडलकर,मोहिनी भंडलकर,हनुमंत भंडलकर,तुकाराम भंडलकर,ज्ञानदेव भंडलकर यांनी त्यांच्या हातातील लोखंडी गजाने मारहाण केली.

दरम्यान फिर्यादीचे पती शिवाजी मारकड व फिर्यादीची नंनद सविता हे भांडणे सोडवण्याकरता आले असता आरोपी ताई भंडलकर व मोहिनी भंडलकर यांनी त्यांच्या केसाला धरून पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.फिर्यादिचे पती व फिर्यादीचे सासरे यांना देखील आरोपी दादा भंडलकर,नंदुलाल भंडलकर,हनुमंत भंडलकर,तुकाराम भंडलकर ,नामदेव भंडलकर,प्रकाश भंडलकर, विठ्ठल भंडलकर यांनी काठीने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली अशा आशयाची फिर्याद नोंदवली आहे. 

या दोन्ही घटनांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस. आय.अरुण रासकर व पो. हवालदार अमोल खैरे करीत आहेत.