जनहित दत्तक योजनेतून पंधरा महिला कुस्तीगीर दत्तक घेणार - अस्लम मुलाणी

जनहित दत्तक योजनेतून पंधरा महिला कुस्तीगीर दत्तक घेणार -  अस्लम मुलाणी

इंदापूर 10 // आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे कोरोना सारख्या महामारी मुळे बऱ्याच पालकांना मुलींच्या खुराकासाठी व परीक्षणासाठी लागणारा खर्च पेलवत नाही .  व त्यामुळे प्रतिभा असणाऱ्या मुलींना त्यांचे प्रशिक्षण अर्धवट सोडावे लागते अशा मुलींना त्यांच्या भविष्यासाठी जनहित कला व क्रीडा ट्रस्ट निमगाव केतकी संचलित, बापूसाहेब अंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलच्या वतीने ८ मार्च जागतिक महिना दिनानिमित्त  जनहित दत्तक योजना सुरू करण्यात आले असून यामध्ये पंधरा महिला कुस्तीगीर मुलींना दत्तक घेतले जाणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अस्लम शाहिस्तेखान मुलाणी  यांनी  दिली.मुलाणी  पुढे म्हणाले ,नुकत्याच पार पडलेल्या कुस्ती स्पर्धा मध्ये महाराष्ट्रीयन मुलींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. ग्रामीण भागातील मुली कुस्ती क्षेत्रांमध्ये देखील पारंगत आहेत, मात्र घरची बेताची परिस्थिती आणि इच्छाशक्ती असूनही केवळ प्रशिक्षणाअभावी  त्यांना कुस्ती क्षेत्रात उतरता येत नाही. त्यासाठी जनहित दत्तक योजना  यंदा यावर्षी जागतिक महिला दिनानिमित्त सुरु करीत आहोत. या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक व गरजू महिला कुस्तीगीर यांनी ट्रस्टच्या कार्यालयात १  एप्रिल २०२१  पूर्वी अर्ज जमा करावेत असे आवाहनही मुलाणी  यांनी केले आहे.