तरुणांच्या त्रासाला कंटाळून तिने केली आत्महत्या,पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील घटना 

तरुणांच्या त्रासाला कंटाळून तिने केली आत्महत्या,पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील घटना 

पंढरपूर दि.14 // पंढरपूर  तालुक्यातील शेळवे गावातील  तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवार दि.१३ रोजी घडली आहे. स्वप्नाली सत्यवान गाजरे अस मयत अल्पवयीन मुलीचे नाव आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या  स्वप्नालीच्या आत्महत्येमुळे शेळवे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

स्वप्नालीने राहत्या घरी ती अभ्यास करीत असलेल्या खोलीमध्ये कोणत्या तरी अज्ञात कारणाने पत्र्याच्या अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.त्यानंतर  स्वप्नाली हिच्या शाळेची बॅगची तपासणी केली असता त्यात अर्ध्या पानाची चिठ्ठी सापडून आली आहे. या चिठ्ठीत तिने आत्महत्येच कारण लिहिले आहे.याप्रकरणी पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तात्काळ आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास पंढरपूर पोलीस करित आहेत.

सुसाईड नोट लिहलेला मजकूर 

"किती सहन करू मी मला आता अजिबात सहन होत नाही. तिरंगा आणि आर्मीचा गणवेश माझ्या नशिबात नाही. कारण रमेश गाजरे, लहु ट्रेलर, स्वप्नील कौलगे यांनी माझ्या स्वप्नाचा तर धुराळाच केलाय. रमेश गाजरेनं हात धरुन केलेली छेडछाड आणि कुणाला सांगु नको म्हणून दिलेली जीव मारणार ही धमकी मला सहन होत नाही. लहु ट्रेलर स्वप्नीलला घेवून दुकानात मोठमोठ्याने घाणरेडी गाणी लावायचा.या पोरांना घेवून नाचायचा. सगळे जण स्वप्नाली म्हणून नववी पासूनच चिडवायची. जाता – येता त्यांच्या नजरेचा मला लय त्रास व्हायचा आजपर्यंत सहन केलं पण आता सहन होत नाही म्हणून मी आज माझं जीवन संपवतेय. हे भारत माते मला माफ कर, आई-बापू मला माफ करा आत्महत्या करणे गुन्हा आहे. तरी सुद्धा मी करतेय" असा मजकूर स्वप्नालीने चिठ्ठीत लिहिला होता.